आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Rushdie Abuse Jnanpith Winner Nemade With Tweet

भालचंद्र नेमाडेंवर इंग्रजी लेखक सलमान रश्दींची अर्वाच्च भाषेत टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दी यांनी ट्विटरवरुन ज्ञानपीठ विजेते मराठी लेखक भालचंद्र नेमाडेंवर शाब्दिक हल्ला केला आहे. भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक सलमान रश्दी यांनी पुन्हा एक नवा वाद निर्माण केला आहे. नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झालेले मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याबद्दल रश्दींनी अर्वाच्च भाषा वापरली आहे.

दोन दिवसांपूर्वी मराठीतील प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना 50वा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांना सलमान रश्दी यांनी ट्विटवरुन शिवीगाळ केली आहे. नेमाडेंनी रश्दींच्या साहित्यावर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, रश्दींच्या पुस्तकांमध्ये ज्याला साहित्य म्हणता येईल असे काहीच नाही. त्यानंतर रश्दींनी ट्विटवरुन नेमाडेंवर शाब्दिक हल्ला केला.
सलमान रश्दींनी त्यांच्या साहित्यावर नेमाडेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्विटरवर पोस्ट केले आहे, 'तापट म्हातार्‍या तुला मिळालेला पुरस्कार घे आणि धन्यवाद म्हण. ज्या साहित्यिकावर तू टीका करत आहेस, त्याचे साहित्य तू वाचलं आहेस की नाही याची मला शंका आहे.' रश्दी यांचे मुळ ट्विट हे इंग्रजीत असून यापेक्षाही अर्वाच्च भाषेत नेमाडेंवर आगपाखड केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटसोबत नेमाडेंच्या वक्तव्याची लिंक देखील दिली आहे.
काय म्हणाले होते नेमाडे
नेमाडेंनी बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दींबद्दल म्हटले होते, की रश्दींनी मिडनाइट चिल्ड्रन शिवाय दुसरे कोणतेही नाव घ्यावे आणि ज्याला साहित्य म्हणावे असे लिहिलेले नाही.
सलमान रश्दी यांनी नेमाडेंवर आगपाखड केलेले ट्विट सोशल साइटवर 249 वेळा रि-ट्विट केले गेले आहे. 171 लोकांनी त्याला फेव्हरिट्स केले आहे. रश्दींच्या भाषेचा अनेक युजर्सनी समाचार देखील घेतला आहे.
ट्विटरवर तिखट प्रतिक्रिया
रश्दींच्या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या अर्वाच्च भाषेबद्दल त्यांना सुनावले आहे. @dreamershivam यांनी ट्विट केले आहे, की तुमचे ट्विट वाचल्यानंतर मला वाटते त्यांनी (नेमाडेंनी) तुमच्याबद्दल बरोबर म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, नेमाडेंचेही वादाशी नाते