आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Says My Mother Is Susheela Charak Father Is Salim Khan

#intolerance वर सलमान म्हणाला - माझ्या आईचे नाव सुशीला चरक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या (intolerance) मुद्यावर अभिनेता शाहरुख खानने केलेल्या वक्तव्यावर जेव्हा सलमान खानला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मला फक्त एवढे माहित आहे की माझ्या आईचे नाव सुशीला चरक आहे आणि वडिल सलीम खान आहेत.' सलमान खानची आई सलमा खान यांचे खरे नाव सुशीला चरक आहे.

काय आहे प्रकरण
सलमान खान त्याच्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिल्मच्या कलाकारांसह दिल्लीला आला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर होती. यावेळी सलमानला शाहरुखने नुकतेच दिलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी छेडले. देशातील कथिक वाढत्या असहिष्णुतेवरुन साहित्यिक, चित्रपट निर्माते पुरस्कार परत करत आहेत, त्याबद्दलही सलमानला विचारण्यात आले. त्यावर सलमान खान म्हणाला, 'या मंचावरुन अशा विषयावर चर्चा करणे योग्य नाही. मी येथे चित्रपटाबद्दल सांगण्यासाठी आलो आहे.' मात्र जेव्हा सलमानला परत-परत तेच प्रश्न विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मी परत सांगतो, माझी आई सुशीला चरक आहे आणि वडिल सलीम खान आहेत. मी सलमान खान आहे आणि ही सोनम कपूर आहे. आम्ही सगळे येथे एकत्र बसलो आहोत. याने काही फरक पडला आहे का?'

सलमानला विचारला प्रश्न, सोनमने दिले उत्तर
भारतीय जनता पक्षाचे खासदार आदित्यनाथ यांनी अभिनेता शाहरुख खान आणि दहशतवादी हाफिजची भाषा एकच असल्याचे बुधवारी म्हटले. त्याबद्दल जेव्हा सलमानला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सोनम म्हणाली, 'कोणीही काहीही बोलत आहे. त्याला कोणतेही पुरावे नाहीत की आधार नाही. अशी वक्तव्ये कशी मान्य होतील. लोक जात-धर्म-संप्रदाय यावर काहीही बोलत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला 'प्रेम रतन धन पायो'वर फोकस केला पाहिजे. हा चित्रपट प्रेम आणि सहनशिलतेवर आहे.'

...जेव्हा सलमानने विचारला पत्रकाराला प्रश्न
त्यानंतरही सलमानवर असहिष्णुतेचा मुद्दा, शाहरुख यांच्यासंबंधीच्या प्रश्नांचा भडीमार सुरुच होता. एका पत्रकाराने जेव्हा जोर देऊन विचारले की, शाहरुखच्या मुद्यावर तुम्ही बोलले पाहिजे. सलमान म्हणाला, 'ते काहीही बोलतील आणि तुम्ही मला जाब विचारणार. ते काय म्हणाले हे मला माहिती नाही? मी तर त्यांची गळाभेट घेत होतो.' दुसऱ्या एका पत्रकाराने देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेवर सलमानचे मत विचारले, तेव्हा तो म्हणाला, 'तुम्हीच सांगा, तुम्ही प्रेसचे लोक आहात, खरच असहिष्णुता वाढत आहे?' पत्रकार म्हणाला,'मला तसे वाटत नाही, फक्त तसे वातावरण तयार केले जात आहे.' त्यावर सलमान म्हणाला, 'जेव्हा तुम्हालाच असे वाटत आहे की फक्त तशी वातावरण निर्मीती सुरु आहे तर तशा मुद्याला अधिक महत्त्वा का देत आहात ? तुम्ही त्यावरच चर्चा का करता ? तिकडे कोणी तरी काही म्हणाले की इकडे तुम्ही त्यावर चर्चा सुरु करता.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सलमान-सोनमचे आणखी फोटो