आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अॅंड रन प्रकरण : सुप्रीम कोर्टातून घेतली सलमान खानने माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ च्या हिट अँड रन प्रकरणात निर्दोष मुक्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपट अभिनेता सलमान खान याने त्याचा मित्र व गायक कमाल खानला साक्षीदार म्हणून बोलावण्याची मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका गैरलागू ठरते, असे सलमानच्या वकिलांनी न्यायमूर्ती मदन लोकुर यांच्या न्यायपीठास सांगितले. त्यानंतर न्यायपीठाने त्यांना ही याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. ३० नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने सलमानच्या या मागणीची याचिका फेटाळली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी हिट अँड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने सलमानला ठोठावलेली पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली. अपघातावेळी सलमान कार चालवत होता आणि त्या वेळी तो दारूच्या नशेत होता, हे अभियोजन पक्ष सिद्ध करू शकला नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यावरील सर्व आरोप रद्द केले होते.