आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांपासून ISI साठी हेरगिरी करीत होता SP खासदारांचा PA, पिझ्झा-बर्गर होते कोडवर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात फरहत. - Divya Marathi
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात फरहत.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हायकमीशनमधून सुरु असेलेल्या हेरगिरी रॅकेटमधील चौथा आरोपी फरहत संबंधी नवा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की फरहत गेल्या 20 वर्षांपासून आयएसआयला माहिती पूरवत होता. फरहतला शनिवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे. आरोपी फरहत समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य चौधरी मुनव्वर सलीम यांचा पीए म्हणून काम करीत होता.
गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान हायकमीशनमधील व्हिसा ऑफिसर मेहमूद अख्तरसह तिघांना अटक केली होती. मेहमूद आयएसआय एजंट होता. त्याला हेरगिरीसाठी भारतात पाठवण्यात आले होते. त्याची भारताने हकालपट्टी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...