आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party Leader Azam Khan Comment On Union Election Commission Working Process

आझम खान पुन्हा बरळले; कॉंग्रेसच्या आदेशावरून चालते निवडणूक आयोगाचे काम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते अाझम खान यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. कॉग्रेसच्या आदेशावरून केंद्रीय निवडणूक आयोगाचे काम चालत असल्याचा आरोप आझम खान यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर निवडणूक आयोगाला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागेल, अन्यथा गरज पडल्यास आपण कोर्टात जावू, अशा इशाराही आझम खान यांनी दिला आहे.

चिथावणीखोर भाषण दिल्यावरून आझम खान यांच्या सभांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने माझ्यावर अन्याय केला आहे.

दरम्यान, गेल्या 11 एप्रिलला अमित शहा आणि आझम खान यांना निवडणूक आयोगाने जाहीर सभा आणि रोड शो घेण्यास प्रतिबंध केले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.