आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यांच्या समर्थनार्थ 206 आमदारांचे शपथपत्र, CM म्हणाले- चिन्हाची चिंता सोडून कामाला लागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
206 आमदारांनी अखिलेश यांना समर्थन असल्याचे शपथपत्र भरुन दिले असल्याची चर्चा आहे. - Divya Marathi
206 आमदारांनी अखिलेश यांना समर्थन असल्याचे शपथपत्र भरुन दिले असल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली/लखनऊ - समाजवादी पक्षातील यादवीच्या पार्श्वभूमीकवर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यात साधारण 206 आमदार सहभागी झाले. अशी माहिती आहे की या सर्व आमदारांनी अखिलेश यांना पाठिंबा देण्यासाठी शपथपत्र भरुन दिले आहे. यावेळी अखिलेश म्हणाले, 'निवडणूक चिन्हासह सर्व चिंता माझ्यावर सोडून द्या. नेताजी (मुलायमसिंह) आमच्यासोबत आहेत. त्यांच्या आशीर्वाद माझ्यासोबत आहे.' दुसरीकडे निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाच्या 'सायकल' या निवडणूक चिन्हावर दावा सांगणाऱ्या बाप-लेकाला (मुलायमसिंह आणि अखिलेश) 9 जानेवारीपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. मुलायम आणि अखिलेश या दोन्ही गटांनी सपाच्या सायकल चिन्हावर दावा सांगितला होता. 

एक आमदार म्हणाले- अखिलेश यांच्या नेतृत्वातच निवडणूक
- बैठकीनंतर आमदार गोमती यादव म्हणाले, 'निवडणुक अखिलेश यांच्या नेतृत्वातच लढविली जाईल. नेताजी दिल्लीत आहेत. ते परत आल्यानंतर त्यांच्यासोबच चर्चा केली जाईल.'
- अखिलेश यादव यांनी जी उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे त्यात 171 सिटिंग एमएलएंना तिकिट दिले आहे. त्यांनी आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. 
- सपा सूत्रांच्या माहितीनुसार, अखिलेश यांनी बोलावलेल्या बैठकीला 180 आमदार उपस्थित होते. 
- या सर्वांकडून संमती पत्र भरुन घेऊन ते निवडणूक आयोगाला दिले जाऊ शकते.
- अशीही माहिती आहे की अखिलेश सर्व आमदारांना घेऊन दिल्लीलाही जाऊ शकतात. दुसरीकडे सपामधील वाद निस्तारण्यासाठी मुलायमसिंहाचे विश्वासू समजले जाणारे आझम खान अखिलेश यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. 
 
आमदारांच्या बैठकीत काय म्हणाले अखिलेश 
- आमदारांना मुख्यमंत्री अखिलेश म्हणाले, मी नेताजींकडून फक्त 3 महिन्यांचा वेळ मागितला आहे. 
- 'मी त्यांना म्हणालो तुम्ही मला फक्त 3 महिन्यांची मुदत द्या, त्यानंतर सगळं काही तुम्ही घेऊन टाका. तुम्हीच मला मुख्यमंत्री केले आहे. तुम्हाला वाटेल त्याला अध्यक्ष करा, माझी काहीही हरकत नाही, फक्त मला 3 महिन्यांचा वेळ द्या.'
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे वाद..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...