आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party Wants Beniprasad Verma Resignation

शरद पवार-मुलायम सिंह यादव भेटीमुळे दिल्‍लीत राजकीय चर्चेला उत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली: द्रूमुकने पाठिंबा काढल्‍यानंतर युपीए सरकारसमोर एक नवे संकट उभे राहिले आहे. सरकारला सध्‍या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीचा आधार आहे. परंतु, सपाचे अध्यक्ष मुलायम‍ सिंह यादव आणि केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांच्‍यातील वादामुळे सरकार अडचणीत येण्‍याची शक्‍यता आहे. मुलायम सिंह यादव यांनी वर्मा यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी केली आहे. परंतु, वर्मा यांनी स्‍पष्‍ट नकार दिला आहे. हा वाद सरकारला अडचणीत आणू शकतो. दरम्‍यान, मुलायम सिंह यादव यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची दिल्‍लीत भेट घेतली. त्‍यामुळे पुन्‍हा राजकीय चर्चा सुरु झाली. परंतु, दोन्‍ही नेत्‍यांनी या भेटीमागे राजकीय उद्देश नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. दोघांनाही 24 मार्च रोजी एका कार्यक्रमात सहभागी व्‍हायचे आहे. त्‍याबाबत भटीमध्‍ये चर्चा झाली, असे उत्तर दोघांनी दिले. मात्र, या भेटीनंतर शरद पवार पुन्‍हा या वादाच्‍या चित्रात आले आहेत.