आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party's Ex MP Actress Jayaprada Join BJP

अभिनेत्री जयाप्रदा देणार आपला टक्कर?, भाजप प्रवेशाची दाट शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचा ग्लॅमर चेहरा आणि रामपूरच्या माजी खासदार जयाप्रदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, त्या अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्ली विधानसभा निवडणूक देखील लढू शकतात.
जयाप्रदा यांनी 2014 मध्ये झालेली लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोकदलाच्या (आरएलडी) तिकीटावर लढली होती. त्यांचे निकटवर्तीय अमरसिंह यांनी देखील आरएलडीच्याच तिकीटावर निवडणूक लढली होती.
दरम्यान, अण्णा हजारांच्या अंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या माजी पोलिस अधिकारी किरण बेदी या गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या शाजिया इल्मी या देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. (येथे क्लिक करुन वाचा शाजिया इल्मी यांच्या प्रवेशाविषयी)

फोटो - जयाप्रदा आणि अमरसिंह यांचे संग्रहित छायाचित्र