आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान लँड होताना सॅमसंग नोट 2 ला आग, भारतातील पहिली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिगो फ्लाइटमध्ये सॅमसंग नोट 2 मध्ये आग लागली. - Divya Marathi
इंडिगो फ्लाइटमध्ये सॅमसंग नोट 2 मध्ये आग लागली.
नवी दिल्ली - सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये आग लागणे आणि स्फोट होण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. भारतात अशा प्रकारची पहिली घटना चेन्नई विमानतळावर लँडिंग दरम्यान एका कमर्शियल फ्लाइटमध्ये घडली. इंडिगो फ्लाइटमध्ये सॅमसंग नोट 2 मोबाइल फोनला आग लागली. नोट 2 संदर्भातील ही काही पहिली घटना नव्हती. या फोनबाबत अशा घटना अनेकदा घडल्या होत्या. त्यानंतर कंपनीने या फोनची विक्री बंद केली होती. सर्व यूजर्सला हे हँडसेट परत करण्यासही सांगण्यात आले होते.
इंडिगो फ्लाइडमधील घटना
- सॅमसंग नोट 2 ला आग लागण्याची ही घटना इंडिगो फ्लाइटमध्ये घडली. यावेळी विमान सिंगापूरहून चेन्नई विमानतळावर लँड होत होते.
- हँडसेट फ्लाइटच्या ओव्हरहेड बिन (वरच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये)मध्ये ठेवलेला होता.
- क्रु मेंबर्सला बिनमधून धुर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी सामानाजवळ पाहिले तर तिथे ठेवलेल्या सॅमसंग नोट 2 मोबाइलमध्ये आग लागली होती.
- डीजीसीएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की यामुळे फ्लाइटचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...