आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sangeet Som Fearless Travel Today In Kairana And Counter Part To Pradhan Goodwill Visit

हिंदूंना 15 दिवसांत कैरानात परत आणा; संगीत सोम यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैराना- लखनऊ-कैरानातील हिंदूंना १५ दिवसांत परत आणावे, असा इशारा भाजपचे आमदार संगीत सोम यांनी शुक्रवारी राज्य सरकारला दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थलांतरितांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तत्पूर्वी सोम यांची निर्भय सपा नेते अतुल प्रधान यांच्या सद््भावना यात्रेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शामली जिल्ह्यात शुक्रवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतरही भाजपचे सोम समाजवादी पार्टीचे नेते अतुल प्रधान यांनी स्वतंत्र रॅली काढल्या. सोम यांनी सारदाना मतदारसंघातून कैरानाच्या दिशेने निर्भय रॅलीस सुरुवात केली. कैरानापासूनचे हे अंतर ६० किलोमीटरचे आहे. त्यांच्या रॅलीत हजारो समर्थकही सहभागी झाले होते. त्यांची रॅली दोन किलोमीटर असताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे त्यांना रॅली स्थगित करावी लागली.

सोम हे २०१३ च्या मुजफ्फरनगर दंगलीच्या प्रकरणातील आरोपी आहेत. १५ दिवसांत हिंदू कुटुंबांना पुन्हा कैरानात परत आणण्यात आले नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा सोम यांनी दिला आहे. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते शिवपाल यादव म्हणाले, भाजप आगामी विधानसभा निवडणुकीस डोळ्यासमोर ठेवून जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कैरानातील वास्तव जाणून घेण्यासाठी आम्ही पाच जणांच्या एका समितीची शिफारस केली आहे. ही समिती प्रत्यक्ष कैरानात जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल तयार करतील. सोम हे दंगलीतील आरोपी आहेत. त्यांच्या रॅलीला रोखण्यासाठी मी यात्रा काढली, असे प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, कैरानात मुस्लिम समुदायाकडून छळ होत असल्याने हिंदूंची काही कुटुंबे भीतीपोटी गाव सोडून निघून गेली आहेत. ही संख्या ३४६ वर आहे, असा आरोप आहे, परंतु प्रशासनाने केवळ तीन कुटुंबांनी गाव सोडल्याचे म्हटले आहे.

‘ध्रुवीकरणाचे प्रयत्न, लोंढे बाहेर गेल्याचा दावा खोटा’
कैरानातून एका समुदायाचे लोंढे दहशतीमुळे बाहेर गेल्याचा दावा करणे चुकीचे आहे. हा दावा खोटा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. भाजप स्थलांतरित केलेल्या लोकांचे जुने रेशन कार्ड दाखवून दिशाभूल करत आहे. त्यांचा निवडणुकीवर डोळा आहे, असे प्रवक्ते प्रदीप माथूर म्हणाले.
भाजप सपा यांनी रॅली काढून त्यांचे राजकीय हेतू दाखवून दिले आहेत. समाजात जातीयवादी वातावरण तयार करून राजकीय फायदा लाटण्याचा दोन्ही पक्षांचा इरादा आहे. दुर्दैवाने सपा सरकारला मात्र आपल्या धर्माचा विसर पडला आहे, असा आरोप मायावती यांनी केला आहे.

लोंढे जात नाहीत, लढवण्याचा प्रयत्न
कैरानाच काय,राज्यातूनही कोणतेही लोंढे बाहेर जात नाहीत. हा दावा करणे केवळ मूर्खपणाचे आहे. भाजपचे नेते समाजाला केवळ आपसात लढवण्याचे काम करत आहेत. त्यातून त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
-शिवपाल यादव, प्रवक्ता,सपा
बातम्या आणखी आहेत...