आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीच्या काळात विसरता येणार नाही 'नसबंदी', या नेत्याने घेतला होता मनमानी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभर सध्या नोटबंदी विषय गाजत आहे. हजार-पाचशेच्या नोटा, दोन हजारांची नोट, बँक-एटीएम कॅशलेस, देश कतार में, असे सगळे शब्द लोकांच्या अंगवळणी पडले आहेत. निश्चलनीकरणाच्या निर्णयाची तुलना कोणी 1975 मधील आणीबाणीसोबतही केली आहे. आणीबाणीतही असाच एक बंदीचा निर्णय झाला होता. तो निर्णय होता नसबंदीचा !
आज संजय गांधी यांची जयंती आहे. अकाली निधन झालेल्या या नेत्याने आईच्या (इंदिरा गांधी पंतप्रधान असताना) राज्यात मनमानी आणि हुकूमशाही निर्णय घेतले होते. याची काँग्रेससनेच कबुली दिली होती 'द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द नेशन' पुस्तकात.
काँग्रेसला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे पक्षाच्या इतिहासाचा लेखाजोखा यात मांडण्यात आला होता. या पुस्तकात आणीबाणीच्या काळात नसबंदी आणि झोपड्या हटवण्याच्या निर्णयासाठी संजय गांधी यांना जबाबदार धरण्यात आले होते.
आज ज्या प्रमाणे नोटबंदीचे देशातील मोठा वर्ग स्वागत करत असल्याचे सांगितले जाते आहे. तसेच 'द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द नेशन' पुस्तकात सुरुवातीला देशातील मोठ्या वर्गाने आणीबाणीचे स्वागत केल्याचे म्हटले होते, मात्र नंतर संजय गांधी यांचे मनमानी निर्णयांना जनता वैतागली. देशाला विकासाकडे न्यायचे असेल तर लोकसंख्या नियंत्रित असली पाहिजे, असे सांगून संजय गांधींनी नसबंदी अनिवार्य केली होती. त्यासोबतच झोपडपट्टयांची सफाईचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच त्यांनी हुंडाविरोधी उपाय आणि साक्षरतेचाही प्रयत्न केला होता.
मात्र त्यांनी हे सर्व निर्णय मनमर्जीने आणि हुकूमशाही पद्धतीन लागू केल्यामुळे पुढे काँग्रेसला त्याची मोठी परतफेड करावी लागली होती. कदाचित यामुळेच काँग्रेस आता संजय गांधींपासून अंतर ठेवून असते. त्याचे दुसरे कारण त्यांची पत्नी मनेका आणि मुलगा वरुण हे भाजपमध्ये आहेत, हे देखिल असू शकते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संजय गांधींचे दुर्मिळ फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...