फाइल फोटो : कांग्रेस खासदार संजय सिंह आणि त्यांच्या दुस-या पत्नी अमिता सिंह
नवी दिल्ली - अमेठीच्या राजघराण्याच्या 'भूपती महल' च्या वारसा हक्कावरून रविवारी झालेली घटना दुर्दैवी असल्याचे कांग्रेसचे खासदार राजा संजय सिंह यांनी म्हटले आहे. माध्यमांनी या प्रकरणापासून दूर राहायला हवे असे, सोमवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले. भूपती महलच्या हक्कावरून संजय सिंह आणि त्यांच्या पहिल्या पत्नी गरिमा सिंह यांचा मुलगा अनंत विक्रम सिंह यांच्यात वाद आहेत. दरम्यान, गरिमा यांनीही संजय यांच्यावर एकापेक्षा अधिक
विवाह केल्याचा खटला करणार असल्याचे म्हटले आहे.
रविवारी संजय सिंह आणि त्यांच्या दुस-या पत्नी अमिता अमेठीत आल्याची बातमी मिळताच काही गावक-यांनी राजवाड्याला घेराव घातला होता. गावकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात काही माध्यमांचे प्रतिनिधीही जखमी झाले होते. तसेच फायरिंगमध्ये एका पोलिस अधिका-याचा मृत्यूही झाला होता.
कुटुंबातील नातेवाईकांमध्ये जसे प्रेमाचे नाते असते, तसेच वादही असतात, असे संजय सिंह म्हणाले. पहिल्या पत्नीचा उल्लेख करताना सिंह म्हणाले की, त्यांची अडचण माझ्या लक्षात आलेली नाही. यात सगळ्यांचेच वेळेचे आणि इतर नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. तसेच पोलिस कर्मचा-याच्या मृत्यूवर त्यांनी शोकही व्यक्त केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा : अमेठीत रविवारी झालेल्या वादाशी संबंधित PHOTO