आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjeev Chaturvedi Anshu Gupta Win Ramon Magsaysay Award

\'रॅमन मॅगसेसे\' पुरस्कार घोषित; संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांची मोहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजीव चतुर्वेदी आणि  अंशू गुप्ता - Divya Marathi
संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता
नवी दिल्‍ली – आशियाखंडातील नोबोल पुरस्‍कार अशी ख्‍याती असलेला 'रॅमन मॅगसेसे'च्‍या वर्ष 2014 पुरस्काराची आज (बुधवारी) घोषणाला झाली असून, यामध्‍ये दिल्लीतील 'एम्स'चे माजी दक्षता अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि 'गुंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता यांचा समावेश आहे.
नेमका कोणत्‍या कार्यालयाबद्दल होणार सन्‍मान ?
सध्‍या एम्सचे उपसचिव म्हणून कार्यरत असलेले संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. एम्सच्या दक्षता अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार त्‍यांच्‍याकडे होता. त्‍यावेळी त्‍यांनी एम्‍सच्‍या कारभारात पारदर्शकता आणत भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली. २०० प्रकरणांची चौकशी करून कारवाई केली होती. या पैकी ७८ प्रकरणातील दोषींना शिक्षाही ठोठावण्यात आली होती. मात्र, त्‍यामुळे त्‍यांना वरिष्‍ठांना रोष पत्‍कारावा लागला. परिणामी, गेल्‍याच वर्षी त्‍यांच्‍याकडून त्‍या पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्‍यांच्‍या याच कार्याबद्दल त्‍यांना हा पुरस्‍कार घोषित झाला आहे. हा पुरस्‍कार घोषित होणारे दुसरे भारतीय अंशू गुप्ता हे एका
कॉर्पोरेट कंपनीत अधिकारी होते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्‍यांनी सन १९९९ मध्ये ‘गुंज’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्‍थेच्‍या माध्‍यमातून अपघात, पूर, भूकंप यासह इतर संक‍टाच्‍या काळात ही संस्‍था नागरिकांना मदत करते. आज या संस्‍थेचे कार्य २१ राज्यांमध्ये सुरू आहे.
कोण देतो हा पुरस्‍कार ?
वर्ष १९५७ मध्ये विमान अपघातात मरण पावलेले अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने फिलीपाईन्स सरकारच्‍या वतीने हा पुरस्‍कार दिला जातो. पत्रकारीता, साहित्य, सामाजिक नेतृत्व, सार्वजनिक सेवा आदी क्षेत्रात असामान्य कार्य केलेल्या आशियाई व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये पन्नास हजार डॉलर्स रोख रक्कमेचा सामावेश आहे.