आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना ‘स्वच्छ भारत हवा, जनतेला ‘सच भारत’; राहुल गांधींची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोपर्यंत ते सत्तेवर नव्हते तोपर्यंत त्यांनी कधीही तिरंगा फडकवला नाही, आणि आता देशभक्ती शिकवत आहेत. - Divya Marathi
जोपर्यंत ते सत्तेवर नव्हते तोपर्यंत त्यांनी कधीही तिरंगा फडकवला नाही, आणि आता देशभक्ती शिकवत आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत हवा आहे. जनतेला मात्र ‘सच भारत’ हवा आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारला टोला लगावला. जदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांनी सर्वपक्षीय विरोधी नेत्यांसाठी गुरुवारी आयोजित संमेलनात ते बोलत होते.
 
मोदी यांनी मेक इन इंडिया नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु देशात तर बहुतेक सर्व चिनी उत्पादने पाहायला मिळतात. म्हणूनच सरकारच्या घोषणांत तथ्य नाही. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरकारने अशीच अनेक आश्वासने दिली होती. परदेशात दडवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणू, तरुणांना रोजगार देऊ, अशी आश्वासने मोदींनी तेव्हा दिली होती. मात्र, अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. मोदींना स्वच्छ भारत हवा, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु आम्हाला सच भारत हवा आहे. ते कोठेही गेले तरी खोटे बोलतात, असा आरोप राहुल यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाची राज्यघटना बदलायची आहे. एक जण म्हणतो हा देश माझा आहे. दुसरा म्हणतो आम्ही या देशाचे आहोत. हा विचारांतील फरक आहे. हा आरएसएस आमच्यातील फरक आहे, असे राहुल यांनी सांगितले. दरम्यान, संमेलनाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा, फारुक अब्दुल्ला या नेत्यांची उपस्थिती होती.
 
चीनपासून धोका नाही, खरे चोर देशात : फारुक अब्दुल्ला
आपलादेश चीन आणि पाकिस्तानचा चांगल्या प्रकारे मुकाबला करू शकतो. परंतु खरे चोर देशात आहेत. देशाला अंतर्गत पातळीवर अधिक धोका आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. संमेलनात ते पुढे म्हणाले, काही लोक आम्हाला आमचे राष्ट्रीयत्व विचारू लागले आहेत. फाळणीच्या वेळी आम्ही पाकिस्तानची नव्हे, भारताची निवड केली होती. कारण भारताने आम्हाला समानतेची ग्वाही दिली होती. म्हणूनच भारतीय मुस्लिम असल्याचे सांगायला मला अभिमान वाटतो. ते लोक एकजुटीची भाषा करत आहेत. परंतु तसे वातावरण ते देत आहेत का? ते खूप बोलतात. मात्र कृती करत नाहीत, असे अब्दुल्ला म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...