नवी दिल्ली - साई बाबांच्या पुजेवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. केंद्रिय मंत्री उमा भारती यांनी साई बाबांच्या पुजेचे समर्थन करताच, वादग्रस्त वक्तव्य करणारे द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. या मुद्यावर उमा भारती यांनी राजकारण करू नये आणि धार्मिक बाबींमध्ये लक्ष देऊ नये, अशा शब्दात शंकराचार्यांनी उमा यांना सुनावले आहे. दरम्यान शंकराचार्यांनी रविवारी हरिद्वारमध्ये संतांची बैठक बोलावली आहे.
शंकराचार्य उमा भारतींवर हल्ला चढवत म्हणाले की, उमा भारती साई पुजेचे समर्थन करून दबावाचे राजकारण करत आहेत. उमा या मंत्री आहेत देव नाही. त्यांना जनतेने सरकार चालवण्यासाठी निवडून दिले आहे. त्यांनी धार्मिक बाबींमध्ये लक्ष देऊ नये.
शंकराचार्यांनी उमा भारती यांच्या गुरू भक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, उमा भारतींनी गुरू विश्वेश तीर्थ यांच्याकडून सन्यासाची दीक्षा घेतली आहे. त्यांनी आमच्या मताचे समर्थन केले आहे. सनातन परंपरेमध्ये सन्यासी हा गुरू बक्त असतो. मत उमा गुरूच्या विरोधात जात असतील तर त्या कशा गुरूभक्त? असा सवाल त्यांनी केला आहे. शंकराचार्य म्हणाले. सनातन व्यवस्थेमध्ये आचार्य धार्मिक बाबी ठरवत असतात. मग कोणते आचार्य साईपुजा योग्य असल्याचे सांगतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा...काय म्हणाल्या होत्या उमा भारती?