आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sans Bahu Gang Arrested For Ransacking Houses In Delhi

दिल्लीत तीन वर्षांपासून धुमाकूळ घालणारी सास-बहू गँग जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - घरातील धुणे-भांड्याचे काम मिळाले तरी चालेल, पण काम द्या, अशी बतावणी करून घरात घुसणा-या आणि घर 'साफ' करणा-या सासू-सूनेच्या टोळीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली पोलिस या टोळीच्या मागावर होते. अटक केलेल्या सुनेचे नाव सीमा आणि सासू सुंदरी देवी असल्याचे पोलिस उपायुक्त पी. करुणाकरण यांनी सांगितले आहे.

या दोघींकडून पोलिसांनी दोन हि-यांच्या अंगठ्या, एक सोन्याची अंगठी, दोन हि-याची कर्णफुले, एक सोन्याची साखळी आणि एक पर्ल सेट असा दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यांची तिसरी साथीदार काजल अजून फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

लजपत नगर येथील रहिवासी रेणू मल्होत्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 9 जून रोजी दोन महिला त्यांच्या घरी आल्या. आम्हाला कामाची फार गरज आहे. तुमच्या घरातील धुणी-भांडी किंवा स्वंयपाकाचेही काम करु, आम्हाला काम द्या, अशी विनवणी त्या करत होत्या. त्या दोघांनी सीमा आणि काजल असे नाव सांगितले होते.

रेणू मल्होत्रा यांनी त्या दोघींना घरात घेतले आणि त्यांच्याशी बोलल्या. उद्यापासून कामाला येतो असे सांगून त्या निघाल्या, त्यानंतर मल्होत्रा वॉशरूममध्ये गेल्या आणि बाहेर येऊन बघतात तर त्यांच्या बेडरुममधील कपाट उघडे होते आणि त्यातील सोन्याच्या दागिण्यांचा बॉक्स गायब होता.