आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanskrit Popularity Increases In Foreign, But Not In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशात संस्कृतच्या लोकप्रियतेत वाढ, भारतात मात्र वाढ कुंठित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संस्कृत केवळ भारतीय भाषांची जननी आहे असे नव्हे, तर सर्व भारतीय-युरोपीय भाषांचा तो स्रोत आहे. मात्र, संस्कृत भाषा स्वदेशातच अस्तित्वासाठी झगडत आहे. शालेय अभ्यासक्रमात विदेशी भाषेच्या बरोबरीने दर्जा मिळण्याइतपत संस्कृतची वाईट अवस्था आहे. दुसरीकडे पाश्चिमात्य देशांमध्ये संस्कृत भाषेची आवड असणे नवी बाब राहिली नाही.


विदेशात संस्कृतची ओढ लागण्यास या भाषेची सात पुस्तके कारणीभूत ठरली आहेत. लंडन येथील सेंट जेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमात ही पुस्तके वापरली जात आहेत. वॉर्विक व इलेना जेसप यांनी या पुस्तकांचे संपादन केले आहे. दिल्लीचे प्रकाशक मोतीलाल बनारसी यांनी पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. आपल्या पुस्तकांमुळे संस्कृतीची ओळख नसलेल्या व्यक्तींना ही भाषा शिकता येते, असा दावा बनारसी यांनी केला आहे.
या पुस्तकांमध्ये चित्रे, उदाहरणे, व्याकरण आणि शब्दकोशाद्वारे संस्कृत शिकवली जाते. एकूण सात पुस्तकांच्या संचातून संस्कृत तीन स्तरांवर शिकवली जाते. संस्कृत इज फन या शीर्षकाचा तीन पुस्तकांचा पहिला स्तर आहे. दुस-या स्तरात स्टोरी ऑफ कृष्णा शीर्षकाच्या संचात दोन पुस्तके, तर तिसºया स्तराच्या शिक्षणात स्टोरी ऑफ रामा शीर्षकाची दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. या माध्यमातून भाषा आणि व्याकरण दोन्हींची माहिती मिळते. पहिल्या तीन भागांमध्ये उच्चारस्थानाच्या आधारावर अक्षरांचे वर्गीकरण करून ती समजण्यायोग्य केली जातात. यातील उर्वरित दोन-दोन भागांमध्ये संस्कृतच्या वैशिष्ट्यपूर्ण व्याकरणातील क्रियापद, काळ, वचन आदी प्रकरणे असतील.


डॉ. प्रोफेसर सत्यव्रत शास्त्री यांची पुस्तकांना प्रस्तावना आहे. नृत्य, संगीत, कला आदी क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींसाठी किंवा योग-आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकांचा उपयोग होईल.