आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santa Banta Type Jokes: Supreme Court To Consider Sikh Community's View

संता-बंता जोकने सरदारजी दुखावतात का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संता-बंताच्या जोकमुळे सरदारांच्या भावना दुखावतात का...? सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला हा प्रश्न विचारला आहे. यामुळे आता यापुढे असे विनोद वाचायला मिळण्याची शक्यताही आहे. कारण कोर्ट या मुद्द्यावरील याचिकेच्या सुनावणीसाठी अाता तयार झाले आहे.
कोर्टाचे म्हणणे आहे की, सरदार अशा विनोदांमुळे दुखावले जात असतील तर आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करण्यास तयार आहोत. संता-बंताचे विनोद प्रकाशित करणाऱ्या पाच हजार वेबसाइट्सवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्ट सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या न्यायपीठाने सांगितले की, ‘संता-बंता शिखांवरील विनाेदांच्या प्रकरणात अनेक जणांकडून याचिका दाखल झाल्या आहेत. यात दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचाही समावेश आहे. अशा याचिका दाखल होत असल्याचा अर्थ आहे की, संपूर्ण शीख समुदाय यामुळे दुखावला गेला आहे. यामुळे संबंधित याचिकाकर्त्या अाणि महिला वकील हरविंदर चौधरी यांच्या याचिकेसह संपूर्ण प्रकरणावर सुनावणी केली जाईल.’ त्या कागदपत्रे सादर करत असताना काेर्टाने अतिरिक्त महाधिवक्ते पी. एस. पटवालिया यांना विचारले की, सरदार म्हणून तुम्हाला याविषयी काय वाटते? सरन्यायाधीश पुढे म्हणाले, आधी अापल्याला वाटले होते की, फक्त हरविंदर यांनाच अशा विनोदांवर आक्षेप होता. मात्र, इतरही याचिका मिळाल्यामुळे आता या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे वाटत अाहे.
दिव्य मराठी विशेष
विनोदांमुळे प्रतिमा बिघडवली जाते
याचिकेतम्हटले आहे की, अशा विनोदांमुळे शीख समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमाही बिघडते. याचिकाकर्त्या हरविंदर चौधरी यांनी कोर्टात सांगितले की, सुमारे पाच हजार वेबसाइट्सवर शीख समुदायाबाबत विनोद आहेत, त्यावर बंदी आणावी. तसेच भविष्यासाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली पाहिजेत. चौधरी यांचे म्हणणे आहे की, अशा जोकमुळे सरदारजींचा अपमान होतो. जेव्हा एखाद्या समुदाय, जातीला निशाणा बनवले जाते तेव्हा प्रचंड आकांडतांडव केले जाते. मात्र, सरदारांच्या अपमानाबाबत कुणी काहीही बोलत नाही. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर हेही याचिका पाहून चकित झाले होते. मात्र, युक्तिवाद एेकल्यानंतर त्यांनी सादर करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली होती. त्यावर सोमवारी कोर्टात सुनावणी झाली.