आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: कृषी उत्पन्नावरही इनकम टॅक्स लावा, सुटही बंद करावी, नीती आयोगाचे विवेक देवरॉय यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नीती आयोगाचे सदस्य व अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी नीति आयोगाच्या तीन वर्षांच्या अजेंड्यावर आयोजित चर्चेत कृषी उत्पन्नावरही कर लागू करण्याचा सल्ला दिला आहे. वैयक्तिक उत्पन्नातील सूट देखील बंद करण्याचे मत त्यांनी मांडले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. यासंबंधी त्यांच्याशी दैनिक भास्करने केलेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे....
 
नीती आयोगाचे सदस्य म्हणाले, वैयक्तिक आयकरातून सुटदेखील बंद करावी
- प्रश्न : तुम्ही कृषी उत्पन्नावरही कर लावण्याचा विचार मांडला आहे. तो कसा लागू होईल ?
उत्तर : माझ्या मते शहर व ग्रामीण भागात आयकरामध्ये अंतर नसावे. सामान्य उत्पन्नाप्रमाणेच कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर लागू करण्यात यावा.
 
- प्रश्न : परंतु कृषी क्षेत्रात उत्पन्न निश्चित नसते. वेतनामुळे उत्पन्न निश्चित असते.
उत्तर :
कृषी क्षेत्रात अनिश्चितता असते, हे खरे आहे. आपण दोन ते तीन वर्षांचे सरासरी उत्पन्न लक्षात घेऊन काही निकष ठरवू शकतो, असे मला वाटते.
 
- प्रश्न : आता कृषी उत्पन्नावर कर नाही. त्यावरून नवीन वादाला तोंड फुटेल, असे तुम्हाला वाटत नाही ?
उत्तर :
कृषी क्षेत्रातील उत्पन्नावर कोणताही कर नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा कर घेतला जातो. त्यावरून वाद सुरू होण्याचा प्रश्नाबद्दल सांगायचे तर आमचा उद्देश काम करणे आहे. वादात सहभागी होणे नाही. नीति आयोगाचे काम नीती तयार करण्याचे आहे. त्यासंबंधी सल्ला देणे किंवा त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना सोबत घेणे हे आहे. आम्ही हेच काम करतो.
 
- प्रश्न : मग या प्रश्नी इतर राज्यांशी चर्चा करणार? नीती आयोगाचे प्रशासकीय मंडळाच्या पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य या मुद्द्यावर सहमत होते का?
उत्तर :
नक्कीच. आम्ही राज्यांशी चर्चा करू. प्रशासकीय मंडळात राज्यांची सहमती आहे किंवा नाही याबद्दल काही बोलण्यासाठी मी अधिकृत नाही.
बातम्या आणखी आहेत...