आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarabjeet Singhs Sister Appeals To Bring His Things Back To India

सरबजितने वापरलेले कपडे, वस्तूंना मायदेशी आणा, दलबीर कौर यांचे आर्जव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानात तुरुंगात ठार झालेल्या सरबजित सिंगच्या वस्तूंना मायदेशात आणावे, अशी मागणी दलबीर कौर यांनी केली आहे. दलबीर कौर यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली.

तुरुंगात असताना सरबजितने वापरलेले कपडे व इतर वस्तू यांना भारतात आणावे. सरबजित लाहोरच्या कोटलखपत तुरुंगात होता. त्याने तुरुंगात असताना काम करून मिळवलेले पैसेदेखील या वस्तूंसोबत माघारी आणले जावेत. या वस्तू पाकिस्तानातून निश्चितपणे परत आणल्या जातील. त्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे दलबीर यांनी सांगितले. पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या सरबजितचा एप्रिल महिन्यात
मृत्यू झाला.

2013 पर्यंत तो तुरुंगात होता. एप्रिल 2013 मध्ये मात्र त्याच्यावर तुरुंगातील इतर कैद्यांकडून हल्ला केला होता. तेथे त्याचा मृत्यू झाला. सरबजित हा शेतकरी असून सीमेवरील प्रतिकूल परिस्थितीमुळे तो पाकिस्तानातील एका गावात राहिला होता. त्या वेळी त्याला पाकिस्तानी जवानांनी पकडले.स्मारक उभारणार
सरबजितच्या गावात त्याचे स्मारक उभारण्यात येणार आहे, असे दलबीर कौरने सांगितले. पंजाबमध्ये हे स्मारक बांधण्यात येईल. त्या स्मारकामध्ये सरबजितने तुरुंगवासात वापरलेल्या वस्तू ठेवण्यात येणार आहेत.