आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिला नेत्या ठेवणार गुजरात CM निवडीवर लक्ष्य, गडकरींसोबत करणार नेत्यांशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता गुजरातसह देशाला लागली आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आनंदीबेन यांच्या खांद्यावर आली होती. मात्र त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मोदींच्या नंतर हे पद कोणाला मिळणार याची जेवढी उत्सूकता होती तेवढीच ती आताही आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा परत राज्याच्या राजकारणात परतणार का ? अशीही चर्चा गेल्या दोन दिवसांमध्ये होती. मात्र व्यंकय्या नायडूंनी त्याला पूर्ण विराम दिला आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व छत्तीसगडच्या भाजप नेत्या सरोज पांडे या निरीक्षक म्हणून राज्यातील आमदारांची मते जाणून घेणार आहेत.

कोण आहेत सरोज पांडे
सरोज पांडे यांनी त्यांच्या कामगिरीने विश्वविक्रम प्रस्थापीत केला आहे. या महिलेने एकाच वेळी आमदार, खासदार आणि महापौर पद भुषवून इतिहास निर्माण केला होता. अशा प्रकारचे भारतीय राजकारणातील हे एकमेव उदाहरण आहे. राजकारणासाठी पूर्ण वेळ देता यावा यासाठी या महिलेने लग्नही केलेले नाही.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सरोज पांडे यांचा राजकीय इतिहास
बातम्या आणखी आहेत...