आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarsanghachalk Live Broadcasting Is Fair Javdekar

सरसंघचालकांचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात गैर काहीच नाही, जावडेकरांचे समर्थन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दूरदर्शनवरून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात गैर काहीच नाही, अशा शब्दात माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
यांनी या कृतीची जोरदारपणे पाठराखण केली. दरम्यान, काँग्रेसने जावडेकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

विजयादशमीच्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी डीडीवरून तासाभराचे प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. त्यावरून राजकीय क्षेत्रात प्रचंड वादंग निर्माण झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम प्रसारण करून गैरवापर केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
दूरदर्शन स्वायत्त संस्था आहे. त्यात व्यावसायिकता आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीनेच आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच संघाच्या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात काहीही चूक झाली नाही. जावडेकर नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

इतिहासात पहिल्यांदाच
नागपूरमध्ये अनेक वर्षांपासून संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम घेतला जातो. परंतु आतापर्यंत त्याचे प्रसारण सरकारी टीव्ही वाहिनीवरून झाले नव्हते. त्यामुळे विरोधकांनी सरकारकडून चुकीची कृती झाल्याचा आरोप केला आहे. आता इतर समुदायाकडून देखील अशा प्रकारच्या प्रसारणाचा आग्रह धरला जाऊ शकतो.

आम्ही तर बंदी उठवली
काँग्रेस आणि डाव्या पक्षांची टीका फेटाळून लावताना ते म्हणाले, आम्ही तर डीडीवरील एवढ्या वर्षांची बंदी उठवली आहे. खासगी वाहिन्या संघाच्या कार्यक्रमाचे नेहमीच प्रसारण करत आल्या आहेत. मग दूरदर्शन एवढ्या वर्षांपासून दूर का राहिले, हेच मला कळत नाही.