आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Upadhyay Supporters Protest Outside Delhi BJP Office

भाजप कार्यालयाबाहेर शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी, नुपूर शर्मांच्या बैठकीतही गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - कार्यालयाबाहेर आंदोलन करणारे कार्यकर्ते.
नवी दिल्ली - दिल्ली भाजप कार्यालयाबाहेर मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. सतीश उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळाली आहे.
त्याशिवाय पूर्वांचलला प्रतिनिधीत्व न मिळाल्यानेही कार्यकर्त्यानी आंदोलन केले. या दरम्यान, कार्यकर्त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार नुपूर शर्मा यांच्या बैठकीतही कार्यकर्त्यांनी हंगामा केला आणि त्यांना बोलू दिले नाही.

भाजपने काल रात्री उशीरा 62 उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात सतीष उपाध्याय यांच्या नावाचा समावेश नव्हता. यासंदर्भात सतीश उपाध्याय यांना विचारण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, मी पक्षाचा कार्यकर्ता असून भाजपचा विजय व्हावा ही माझी जबाबदारी आहे. निवडणूक न लढवण्याचा निर्णय आपला स्वतःचा असल्याचेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले. दिल्लीत 70 मतदारसंघ आहेत. सगळेच निवडणूक लढवू लागले तर काम कोण करणार असे ते म्हणाले. मला सगळ्या 70 मतदारसंघात निवडणूक लढवून तेथे कमळ फुलवायचे आहे. तसेच आंदोलन क्षणिक असून सगळेच पक्षनेतृत्त्वाचा सन्मान करतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

केजरीवालच्या आरोपांमुळे तिकिटाचे घोडे अडले
किरण बेदींच्या भाजप प्रवेशापूर्वी दिल्लीची जबाबदारी असलेल्या सतीष उपाध्याय यांची उमेदवारी केजरीवाल यांच्यामुळे रखडली असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप ने आता त्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांनी नुकताच वीज कंपन्या आणि सतीष उपाध्याय यांचे संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर सतीष उपाध्याय यांनी आपली कंपनी केवळ मीटर लावत असल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. वीट कंपन्यांनी मीटर विक्री केली नसल्याचेही ते म्हणाले होते. केजरीवालांच्या आरोपाबरोबरच उपाध्याय यांच्या निकटवर्तीयांनी किरण बेदी यांना केलेला विरोध हाही त्यांना उमेदवनारी न देण्याचे कारण असल्याची चर्चा आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित PHOTO