आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमित्‍त जवानांना भेट, सॅटलाईट फोनने 1 रु./मिनिट दराने कुटुंबाशी बोलू शकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- केंद्राने दिवाळीनिमित्‍त फोर्स आणि पॅरामिलिट्रीच्‍या जवानांना एक भेट दिली आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्‍हा यांनी सांगितले की, जवान आता गुरुवार पासून एक रुपये/मिनिट या कॉलिंग दराने आपल्‍या कुटुंबाशी बोलू शकतात. याआधी बहुंताश कनेक्शन्‍सवर हा दर 5 रुपये/मिनिट असा होता. यातील काही कनेक्‍शन्‍स मात्र अनुदानित होते. यांवर 1रुपये/मिनिट या दराने बोलता येत होते. 

Q&A द्वारे जाणुन घ्‍या, जवानांशी संबंधित​ निर्णय 
 
Q. केंद्राने का घेतला हा निर्णय? 
A. सिन्‍हा यांनी सांगितले की, अतिदुर्गम परिसर आणि सीमेसारख्‍या कठीण पोस्‍टवर तैनात असलेले जवान या निर्णयामुळे आपल्‍या कुटुंबाशी 1 रुपये/मिनिट दराने सॅटलाईट फोनवरुन बोलू शकणार आहेत. पूर्वी यासाठी त्‍यांना 5 रुपये खर्च करावे लागायचे. या निर्णयामुळे ते अधिक वेळ आपल्‍या कुटुंबाशी बोलू शकणार आहेत. 

Q- याव्‍यतिरिक्‍त सरकारने आणखी काही सवलत दिली आहे का?
A- सुरक्षा दलाला सॅटलाईट फोनच्‍या कनेक्‍शनसाठी महिन्‍याला 500 रुपयांचे भाडे द्यावे लागायाचे. गुरुवारपासून हे भाडे देण्‍याची आता गरज राहिलेली  नाही. 

Q. कोणातर्फे पुरवली जाते ही सेवा?
A- याआधी सेटलाईट फोन सेवा टाटा कम्‍युनिकेशन्‍सतर्फे दिली जायची. आता मात्र ही सेवा बीएसएनएल पुरवते. 2009-10 मध्‍ये कॉलिंग दर 1 रुपया होता. त्‍यांनतर मात्र तो वाढत गेला. दर 5 वर्षांनी या दरांची पुनर्रचना केली जाते.  आम्‍ही आता निर्णय घेतला आहे की, हा दर 1 रुपये/मिनिट राहील व 5 रुपयांपर्यंत त्‍याला वाढवले जाणार नाही. 
 
Q- याचा सरकारवर किती परिणाम पडेल?
A- दुरसंचार सचिव अरुणा सुंदरराज यांनी सांगितले की, 'या निर्णयामुळे सरकारवर दरवर्षी 3 ते 4 कोटींचा भार पडणार आहे.' 
 
Q- सध्‍या देशात किती सेटलाईट कनेक्‍शन्‍स आहेत?
A- सुंदरराजन यांनी सांगितले की, 'देशात सध्‍या 2500 सेटलाईट कनेक्‍शन्‍स आहेत. आपली क्षमता 5000 सेटलाईट कनेक्‍शन्‍सची आहे. आम्‍ही गृहमंत्रालयाला सुचविले आहे की, आणखी कनेक्‍शन्‍स दिले जाऊ शकतात. गरज पडल्‍यास पुढील 6 महिन्‍यांत या क्षमतांना आणखी वाढवले जाईल. 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज... 

  
बातम्या आणखी आहेत...