आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyajit Ray's Stories For Children In New Translation News In Divya Marathi

सत्यजित रेंच्या बालकथांचा खजिना खुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सत्यजित रे यांची ओळख महान दिग्दर्शक अशी असली तरी त्यांचा लेखक म्हणून असलेला पैलू अलीकडेच जगासमोर आला आहे. मुलांसाठी त्यांनी शेकडो गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.

सत्यजित रे यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अनुवाद असलेल्या ‘द मॅजिक मूनलाइट फ्लॉवर अँड द ऑदर एंचाटिंग स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन अलीकडेच झाले आहे. रेड टर्टल प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले आहे. त्यात काल्पनिक, परिकथा, विज्ञानकथा इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. सत्यजित यांचा लेखनाचा प्रचंड झपाटा होता. त्यात बालकथा आणि तरुण वर्गासाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे. हे लेखन प्रामुख्याने बंगाली भाषेतील आहे. बालमनाचे भाव त्यांनी आपल्या गोष्टीतून अचूकपणे मांडले आहेत. अर्णव सिन्हा यांनी सत्यजित रे यांच्या कथांचा इंग्लिशमधून अनुवाद केला आहे. सत्यजित यांच्या अनेक कथांमध्ये तरुणसुलभ भावनांना चितारताना कारुण्याची वेगळी छटाही दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर रे यांनी ‘संदेश’ नावाचे मुलांचे मासिक सुरू केले होते. त्या वेळी सत्यजित त्या मासिकाचे सहसंपादक म्हणून काम पाहायचे. त्यामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या होत्या.
संग्रहातील कथांविषयी..

सत्यजित रे यांच्या कथासंग्रहातील पहिली गोष्ट सुजन हरबोला नावाच्या मुलाची आहे. सुजनला पक्ष्यांप्रमाणे बोलण्याची सवय असते. पक्ष्यांप्रमाणे हुबेहूब आवाज काढण्याची कला त्याच्याकडे असते. परंतु ही कला शहरातील अनेक विद्यार्थ्यांना बहुदा माहीतदेखील नसते. त्या मुलाकडे असलेल्या वेगळ्या देणगीमुळे गोष्टीच्या शेवटी त्याचा विवाह एका राजकुमारीसोबत कसा होतो, यावर सत्यजित यांनी प्रकाश टाकला आहे. ‘गंगारामज लकी स्टोन’, ‘द ऑगरी अँड प्रिन्सेस’, ‘मॅजिक मूनलाइट फ्लॉवर’ अशा इतर तीन कथांसह एकूण चार कथांचा त्यात समावेश आहे.

बहुपेडी व्यक्तिमत्त्व
दिग्दर्शक, लेखक यासोबतच प्रकाशक, मांडणीकार, कॅलिग्राफर, ग्राफिक डिझायनर, चित्रपट समीक्षक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून सत्यजित खूप मोठे होते.