आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीची US ला धमकी, बील पास झाल्‍यास 750 अब्‍ज डॉलरची मालमत्‍ता विकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्‍या वर्षी सौदी अरेबियाचे किंग सलमान बिन आणि बराक ओबामा यांच्‍यात चर्चा झाली होती. (फाइल फोटो) - Divya Marathi
गेल्‍या वर्षी सौदी अरेबियाचे किंग सलमान बिन आणि बराक ओबामा यांच्‍यात चर्चा झाली होती. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्‍यात 9/11 बिलावरून तणाव वाढताना दिसत आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेला चेतावणी दिली की, सप्‍टेंबर 2011 हल्‍ल्यासाठी त्‍यांना दोषी ठरवले तर, ते अमेरिकेतील आपल्‍या 750 अब्‍ज डॉलरच्‍या मालमत्‍तेची विक्री करतील. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जप्‍त करण्‍याच्‍या भितीने विकली जाऊ शकते मालमत्‍ता....
- न्‍यूयॉर्क टाइम्‍सच्‍या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाचे म्‍हणने आहे की, अमेरिका कॉंग्रेस 9/11 बील पास करू शकते.
- सौदी अरेबियाला भिती आहे की, हे बील पारित झाल्‍यानंतर त्‍यांनी अमेरिकेत खरेदी केलेली 750 अब्‍ज डॉलरची संपत्‍ती अमेरिकी न्‍यायालय जप्‍त करू शकते.
- सौदीचे परराष्ट्र मंत्री अदेल अल जबेर गेल्‍या महिन्‍यात अमेरिकेच्‍या दौ-यावर होते. तेव्‍हा त्‍यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती.
- सौदी अरेबियाने अमेरिकेत 750 अब्‍ज डॉलरच्‍या ट्रेझरी सिक्युरिटीज आणि इतर मालमत्‍ता खरेदी केल्‍या आहेत.
ओबामा बिलाच्‍या विरोधात, लोकांमध्‍ये नाराजी..
- हे बील कोणत्‍याही पुराव्‍याशिवाय पास होऊ नये असे, बराक ओबामा यांना वाटते. बील पास करू नये अशी अपीलही त्‍यांनी कॉंग्रेसला केली आहे.
- काही कायदे तज्‍ज्ञ हे बील घेऊन आले होते. ज्‍या लोकांनी 9/11 च्‍या हल्‍ल्यात त्‍यांच्‍या नातेवाईकांना गमावले असे लोक त्‍यांचे समर्थन करत होते.
- ओबामांच्‍या भूमिकेचा विरोध करणा-या लोकांचे म्‍हणने आहे की, सरकार सौदी अरेबियाला वाचवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे.
- याआधी सौदी अरेबियाने कित्‍येकदा सांगितले की, सप्‍टेंबर 2011 च्‍या हल्‍ल्यात त्‍यांचा हात नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...