एक मुलीसाठी तर दुसरी पतीसाठी आली होती भारतातमिळालेल्या माहितीनुसार, गुडगाव पोलिसांनी ज्या दोन नेपाळी महिलांना सौदी डिप्लोमॅट्सच्या घरातून सोडवले आहे त्यातील एक घटस्फोटीत आहे. तिला एक मुलगी आहे. मुलीच्या संगोपनासाठी रोजगाराच्या शोधात ती भारतात आली होती. तर दुसरीचा पती कँसरग्रस्त आहे. पतीच्या उपचारांसाठी पैसे कमावण्याच्या उद्देशाने ती भारतात आली होती. दोन्ही महिलांना बुधवारी रात्री नेपाळला पाठवून देण्यात आले.
नेपाळी महिला घेऊन आली भारतात
पोलिसा सुत्रांच्या माहितीनूसार, या दोन्ही महिलांना एक नेपाळी महिला भारतात नोकरी देण्याचे आमिष देऊन घेऊन आली होती. तिचे नाव कल्पना असल्याचे सांगण्यात आले आहे. कल्पनाने या दोघींना एक प्लेसमेंट एजंसीपर्यंत पोहोचवले. कल्पना दोन लाख रुपये कमिशन घेऊन नेपाळला परत गेली. पोलिसांचा दावा आहे की कल्पानाने आणकी 28 महिलांना भारतात आणले होते. प्लेसमेंट एजंसीमध्ये काम करणाऱ्या अन्वर नावाच्या व्यक्तीने या दोघींच्या गौरवर्णामुळे यांची सौदी डिप्लोमॅट्ससाठी निवड केली. यांच्यासोबत आणखी 30 महिला होता. अन्वरने यांना सौदी डिप्लोमॅट्सला विकले.
पोलिस घेत आहे अन्वरचा शोध
पोलिसांच्या माहितीनूसार अन्वर गुडगामध्ये राहातो. तो नेपाळ आणि उत्तराखंडच्या मुलींच्या शोधात असतो. पोलिसांचे म्हणणे आहे की अन्वर सुंदर मुली आणि महिलांना विदेशातही विकतो. ज्या सर्वसाधारण असतात त्यांना दिल्लीत घरकामाला लावतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो