आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सात लाखांहून अधिक हस्तलिखित पानांचे जतन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात आढळून आलेल्या सात लाखांहून अधिक हस्तलिखितांचे योग्य प्रकारे जतन करण्यात आले आहे. त्यापैकी दोन लाखावर पानांचे डिजिटायझेनचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

३१ मार्च २०१७ पर्यंत केंद्र सरकारने ७ लाख ७८ हजारावर हस्तलिखितांचे जतन करण्याचे काम पूर्ण केले आहे. राष्ट्रीय हस्तलिखित मोहिमे अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २००३ मध्ये हस्तलिखितांचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. त्यासाठी ३४ हस्तलिखित केंद्रांची सुरूवात करण्यात आली होती. राष्ट्रीय मोहिमेद्वारे डिजिटायझेशन देखील सुरू आहे. त्यासाठी काही संस्थांची मदत घेण्यात आली आहे. त्यानुसार २ लाख ६३ हजार हस्तलिखितांना डिजिडाईज करण्यात आले आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

हस्तलिखितशास्त्रावर कार्यशाळा
हस्तलिखित शास्त्रावर आधारित कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन केले जाते. त्यातून हस्तलिखितांबद्दलच्या माहितीची देवाण-घेवाण केली जाते. आतापर्यंत सरकारने त्यासाठी या क्षेत्रात जागृती वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी २ हजाराहून अधिक इच्छूकांना प्रशिक्षण देण्याचे काम केले, अशी माहिती देखील शर्मा यांनी दिली.