आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय आता फाटलेल्या नोटांवर शुल्क लावणार, पैसे काढणेही महागणार; 1 जूनपासून नवा नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करण्‍याची तयारी केली आहे. जीर्ण झालेल्या तसेच फाटलेल्या नोटा बॅंकेतून बदलणार्‍या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बचत खात्यातून पैसे काढणार्‍या खातेदारांकडूनही शुल्क आकारण्याची तयारी बॅंकेने केली आहे. विशेष म्हणजे बँकेचे नवे सेवा शुल्क एक जूनपासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल (सोमवारी) एसबीआयने गृहकर्ज पाव टक्क्याने (0.25) स्वस्त करून आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली होती. महिलांसाठी गृहकर्ज 0.25 टक्के आणि पुरुषांसाठी 0.25 टक्के स्वस्त केले आहे. महिलांना आता 8.35 टक्के  पुरुषांना 8.40 टक्के व्याजाने गृहकर्ज मिळणार आहे. 

नोटा बदलल्यास लागेल शुल्क...
- फाटलेल्या तसेच जीर्ण झालेल्या नोटा एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून बदलल्यास 2 ते 5 रुपर्य शुल्क आकारले जाईल.
- 20 पेक्षा जास्त नोटा ‍किंवा 5000 हजार रुपये मुल्य असलेल्या नोटा बॅंकेतून बदलल्यास संबंधित शुल्क आकारण्यात येईल. सेवाशुल्क वेगळा द्यावा लागेल.
 
- 20 पेक्षा कमी नोटा आणि 5000 रुपये मुल्य नसलेल्या नोटा बदलल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

बचत खात्यातून पैसे काढणे महागणार...
- बँकेने आपल्या बचत खातेदारांही झटका दिला आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा ‍व्यवहार केल्यास खातेदाराकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. विनामुल्य पैसे काढण्याची मर्यादा (फ्री कॅश विद्ड्रॉलची लिमिट) 4 राहील. यात एटीएमद्वारा करण्‍यात आलेल्या व्यवहाराचाही समावेश असेल. याचा अर्थ असा की, एखाद्या खातेदाराने 4 व्यवहार केल्यास त्याच्याकडून कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. माक्ष, त्याने 4 पेक्षा जास्तवेळा व्यवहार केल्यास त्याच्याकडून शुल्क आकारण्यात येईल. यात एटीएमद्वारा करण्यात आलेल्या व्यवहारांचा समावेश असेल. 5 व्या व्यवहारापासून प्रति व्यवहार 20 रुपये शुल्क आकरण्यात येईल.
- खातेदाराने एसबीआयच्या एटीएममधून व्यवहार केल्यास त्याच्याकडून प्रति व्यवहारावर 10 रुपये शुल्क आकारले जातील.
- खातेदाराने इतर बॅंकाच्या एटीएममधून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास प्रति व्यवहार 20 रुपये शुल्क आकारण्यात येईल.
- एक जूनपासून बॅंक केवळ रुपे डेबिट कार्ड विनाशुल्क असेल. मात्र, मास्टर आणि व्हिसा कार्डवर बॅंक शुल्क आकारणार आहे.
बातम्या आणखी आहेत...