आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयमध्ये किमान बॅलन्स नसेल तर शुल्क, महानगरांत किमान पाच हजार ठेवण्याची अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) खात्यांमध्ये किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक केले आहे. किमान बॅलन्स नसेल तर दंड लागेल. महानगरांत ५, शहरांत ३, निमशहरी भागात २ हजार तर ग्रामीण भागांत किमान १ हजार रुपये खात्यावर असायला हवेत.
 
किमान बॅलन्सची अट  व जेवढे पैसे खात्यावर असतील त्यातील अंतर पाहून दंड वसूल केला जाईल. रकमेतील हे अंतर ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर १०० रुपये आणि सेवा कर, हेच अंतर ५०-७५ टक्के असेल तर ७५ रुपये व सेवा कर आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ५० रुपये व सेवा कर द्यावा लागेल. १ एप्रिलपासून एसबीआय बँकेतील तीनपेक्षा अधिक व्यवहारांवर ५० रुपये शुल्क आकारणार आहे. 

ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून ही उपाययोजना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एटीएममधून ग्राहकांना १० वेळा पैसे काढता येतील. यापूर्वी एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांनी १ मार्चपासून महिन्यात चारपेक्षा अधिक व्यवहार केले तर १५० रुपये शुल्क सुरू केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...