आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Agrees To Examine Possible Guidelines To Curb 'Sardar Jokes'

सरदारांवरच नव्‍हे तर कुठल्‍याही समाजावर विनोद नको : सर्वोच्‍च न्‍यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरदारांवरील विनोदच नव्‍हे तर इतर समाजाच्‍या भावना दुखावल्‍या जातील, अशा विनोदावर बंदी असावी, यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालय मार्गदर्शक तत्त्वे आखणार आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्‍यावस्‍थापन समितीने दाखल केलेल्‍या याचिकेवर मंगळवारी सुनावनी करताना सर्वोच्‍च न्‍यायालयाने हा निर्णय दिला. सोबतच हे विनोद थांबवण्‍यासाठी काय करता येईल, या बाबत याचिकाकर्त्यांनाच सहा आठवड्यांमध्ये उपाय सांगावा, असे आवाहनही सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्‍या खंडपीठाने केले.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्‍यावस्‍थापन समितीने नोंदवला आक्षेप...

- सुनवनीदरम्‍यान दिल्ली शीख गुरुद्वारा व्‍यावस्‍थापन समितीने कोर्टाला म्‍हटले की, विद्यार्थ्‍यांनी सामाजिक ग्रुपमध्‍ये संवेदशील विनोद प्रसारित करण्‍यावर बंदी आणावी.
- समितीने हेही म्‍हटले की, विशिष्‍ट्य लोकांना टार्गेट करून केले जाणाऱ्या विनोदांच्‍या आपण विरोधात आहोत.
- समितीने पंजबा, बिहार आणि नॉर्थ ईस्टच्‍या लोकांवर केल्‍या जाणाऱ्या विनोदांवर आक्षेप घेतला.
- समितीकडून याचिकाकर्ते वकील हरविंदर चौधरी आणि अॅड. आर. एस. सुरी कोर्टामध्‍ये उपस्‍थ‍ित होते.

कोर्टाने विचारले होते, संता-बंताच्या जोकमुळे सरदारांच्या भावना दुखावतात का...?
- यावर ऑक्‍टोबर 2015 मध्‍ये झालेल्‍या सुनावनीदरम्‍यान कोर्टाने चौधरी यांना विचारले होते की, संता-बंताच्‍या विनोदामुळे सरदारांच्‍या भावना दुखावतात का ?
- अशा विनोदांमुळे दुखावले जात असतील तर आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करण्यास तयार आहोत, असेही कोर्टाने म्‍हटले होते.
- संता-बंताचे विनोद प्रकाशित करणाऱ्या पाच हजार वेबसाइट्सवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात केली.
याचिकेत काय म्हटले ?
या याचिकेत म्हटले आहे की, अशा विनोदांमुळे शीख समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमाही बिघडते. याचिकाकर्त्या हरविंदर चौधरी यांनी कोर्टात सांगितले की, सुमारे पाच हजार वेबसाइट्सवर शीख समुदायाबाबत विनोद आहेत, त्यावर बंदी आणावी. तसेच भविष्यासाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली पाहिजेत. चौधरी यांचे म्हणणे आहे की, अशा जोकमुळे सरदारजींचा अपमान होतो. जेव्हा एखाद्या समुदाय, जातीला निशाणा बनवले जाते तेव्हा प्रचंड आकांडतांडव केले जाते. मात्र, सरदारांच्या अपमानाबाबत कुणी काहीही बोलत नाही.