आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SC Allows JJB To Deliver Verdict Involving Minor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाल न्यायिक मंडळ आता निर्णय देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत गतवर्षी 16 डिसेंबर रोजी झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी बाल न्यायिक मंडळाला अल्पवयीन आरोपीबाबत निर्णय देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. परवानगीची वाट पाहत मंडळाने आतापर्यंत चार वेळा निर्णय लांबणीवर टाकला होता.

सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने गुरुवारी हा निकाल दिला. माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामींची याचिका पीठाने स्वीकारली आहे. गंभीर गुन्ह्यात अल्पवयीनाच्या वयाऐवजी मानसिक व बौद्धिक परिपक्वता याला आधार मानण्यात यावे, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.


त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवून याबाबत मत मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मंडळाने 31 ऑगस्टपर्यंत निकाल लांबणीवर टाकला आहे. ज्युवेनाइल शब्दाची व्याख्या न्यायालय करत नाही तोवर निकाल दिला जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले होते.