आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SC Asks FB & WhatsApp To Give Assurance That They Wont Transfer Data Of Consumers To Third Party

SC ने FB-व्हॉट्सअॅपला शपथेवर लिहून मागितले- ग्राहकांचा डाटा तिसऱ्या व्यक्तीला देणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने आश्वस्त केले पाहिजे की ते ग्राहकांचा डाटा तिसऱ्या व्यक्तीला शेअर करणार नाही. असे शपथपत्र चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाला सांगितले की डाटा प्रोटेक्शनसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश बी.एम. श्रीकृष्ण असणार आहेत. केंद्राने सांगितल्यानुसार, 'समिती या प्रकरणी आपला अहवाल सादर करेल. शक्यता आहे की त्यानंतर डाटा प्रोटेक्शनसाठी कायदा तयार करण्यात येईल.'
 
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला काय सांगितले होते... 
- राइट टू प्रायव्हसीच्या निर्णयावेळी सुप्रीम कोर्टाने डाटा प्रोटेक्शनबद्दलही चिंता व्यक्त केली होती. डाटा प्रोटेक्शनसाठी सरकारने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. 
- कोर्ट म्हणाले होते, प्रायव्हसीला धोका फक्त सरकारी यंत्रणांकडूनच नाही तर खासगी कंपन्यांकडूनही होऊ शकतो. 
- नऊ न्यायाधीशांच्या पीठामधील जस्टिस कौल म्हणाले, 'फक्त अॅक्टिव्ह इन्फर्मेशन शेअरिंगद्वारेच डाटा गोळा केला जात नाही तर, पॅसिव्हली देखील वर्ल्ड वाइड वेबवर लोक एका क्लिकद्वारे डाटा गोळा करत आहेत. याचा वापर खासगी कंपन्या त्यांचा कल, आवड आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी करु शकतात.' 
बातम्या आणखी आहेत...