आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्याला परत आणण्यासाठी काय पाऊले उचलली; SC चा सरकारला सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विजय माल्याला भारतात परत आणण्यासाठी काय पाऊले उचलली? असा सवाल सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला आहे. माल्याने डिआजिओकडून मिळालेली 267 कोटींची रक्कम परत आणावी अशा सुचना देण्यासाठी बँकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

माल्याला परत आणण्याचे विषेश न्यायालयाचे आदेश...
900 कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून गेलेल्या विजय माल्याला भारत-यूके म्युचुअल लीगल असिस्टंन्स ट्रीटी ( MLAT) चे पालन करून परत आणण्यासाठी मुंबई येथील विषेश न्यायालयाने आधीच मंजूरी दिली आहे.

गृह मंत्रालयाने पाठवला होता अहवाल...
- गृह मंत्रालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशीसाठी माल्याला भारतात आणण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयाला केली होती.
- या विनंतीसोबत मुंबईच्या विषेश न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अहवाल परराष्ट्र मंत्रालयाला पाठवण्यात आला होता. यात विजय माल्याला भारतात आणण्यासाठी MLAT लावण्यासाठीच्या एन्फोर्समेन्ट डायरेक्टोरेट (ईडी) च्या विनंतीला मंजूरी देण्यात आली होती. 
- एजन्सीची केलेल्या चौकशीच्या आधारावर कोर्टाने ईडीच्या विनंतीला मंजूरी दिली. या प्रकरणात विजय माल्या आणि त्याची बंद झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सवर 900 कोटी रूपये बुडवल्याचा आरोप आहे.

काय आहे MLAT..?
- भारत आणि इंग्लडदरम्यान 1992 मध्ये म्यूचुअल लीगल असिस्टन्स ट्रीटी (MLAT) झाली होती.
- याअंतर्गत दोन्ही देशातील गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना त्या-त्या देशाकडे सोपवण्यात येते.
- या MLAT मध्ये पुरावा देणे, चौकशीसाठी सहकार्य करणे आणि आरोपीच्या कस्टडीचा देखील सामावेश आहे.
- इडीने याच कराराच्या आधारावर माल्याला ताब्यात देण्याची मागणी केली आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...