आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Asks Sebi To Start Sell Of Sahara\'s Properties

\'माय लाॅर्ड! सुब्रतोंची प्रकृती बिघडत आहे, पुढचा उन्हाळा सहन करू शकणार नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जामिनासाठी तरसलेले सुब्रतो रॉय (६७) यांच्यावर सर्वाेच्च न्यायालयात बुधवारी मोठी रंजक चर्चा झाली. सहाराचे वकील न्यायमूर्तींना म्हणाले, ‘मी लार्ड... तुरुंगात भलता उष्मा आहे यामुळे रॉय याची प्रकृती सातत्याने बिघडत चालली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढचा उन्हाळा ते सहन करू शकणार नाहीत.’ त्यावर जज म्हणाले, त्यांना सोडण्यास आमची काहीच हरकत नाही, जर सेबीला पैसे मिळाले तर..

गेल्या काही दिवसांपासून सुब्रतोंची प्रकृती बरी नसते. अशाच कोर्टात त्यांची पेशी झाली. तिहारमधील कोठडी आणि वरून दिल्लीचा उष्मा. सुब्रतोंची अक्षरश: हायतोबा होत आहे. सहाराच्या वकिलांच्या युक्तिवादावर सुप्रीम कोेर्ट म्हणाले, आम्हालाही रॉय यांना तुरुंगात ठेवावे वाटत नाही, ना त्यांना सुटकेवर आक्षेप. अट एकच. सहाराची मालमत्ता विकण्याची सेबीची योजना यशस्वी ठरो अन् त्यातून काहीतरी हाती लागो.

सेबीने बुधवारी सुप्रीम कोर्टात सहाराच्या मालमत्तेचा लिलाव करण्याबाबतचा स्थितिदर्शक अहवाल सादर केला. त्यानुसार, सहाराच्या ६७ मालमत्ता विक्रीस सज्ज
आहेत. पुढील आठवड्यात त्याची प्रक्रिया सुरू होईल. ती चार महिन्यांत पूर्ण होईल. दरम्यान, सेबीला सहाराने ४० हजार कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सोपवल्याचे सांगितले जात आहे. कोर्टानेही सेबीला मालमत्ता विकण्याचे आदेश दिलेले आहेत.

सरन्यायाधीशांनी सुनावणीसाठी ११ मे तारीख मुक्रर केली. तोवर सहाराच्या वकिलांना समूहाच्या मालमत्तेची विस्तृत विवरण यादी देण्यास सांगितले आहे. सेबीकडे सहाराच्या मालमत्ता विक्रीसाठी आहेत. शासकीय दरानुसार त्यांचे मूल्य ६००० काेटी, तर सहारानुसार २० हजार कोटी रुपये आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, दोन वर्षांपासून तिहारमध्ये कैदेत आहेत सुब्रतो राॅय