आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिदंबरम यांच्या मुलाला देश सोडण्यास मज्जाव, CBI समोर हजेरीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमला सर्वोच्च न्यायालयाने देश सोडण्यास मज्जाव केला आहे. यासोबतच, आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती यांना सीबीआय समोर हजर होण्याचे आदेश सुद्धा सोमवारी न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयकडून नोटीस मिळाल्यानंतर कार्ती यांना नोटीसा बजावल्या. मात्र, कार्ती चौकशीसाठी हजर झाले नाही.
 

- यापूर्वी जूनमध्ये सीबीआय आणि ईडीने कार्ती यांना समन्स बजावले होते. मात्र, चौकशीसाठी तपास संस्थांकडे जाणे सोडून कार्तींनी कोर्टात धाव घेतली. यानंतर सीबीआयने कार्ती विरुद्ध लुक आऊट नोटीस जाहीर केली. 
- कार्ति चिदंबरमने लुक आउट नोटिस विरोधात मद्रास हाईकोर्टात अपील केली आहे. तेथून नोटीसाला स्थगिती सुद्धा मिळाली. मात्र, सीबीआयने मद्रास हाईकोर्टाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याच याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सोमवारी कार्ती यांना दिलासा देण्यास नकार दिला. 
- सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी चीफ जस्टिस जे.एस. खेहर आणि जस्टिस जे.वाय. चंद्रचूड यांनी केली.
 
 
काय आहेत आरोप?
- सीबीआयने लावलेल्या आरोपानुसार, ज्या कंपनीवर कार्ति चिदंबरमचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते, त्या कंपनीला इंद्राणी आणि पीटर मुखर्जीच्या मीडिया हाउस (आयएनएक्स मीडिया) कडून फंड मिळाला होता. कार्ति व्यतिरिक्त इतर 4 लोकांना या प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहेत. तसेच कार्ति आणि आयएनएक्स मीडिया विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  
- कार्तिने आपल्या प्रभावाचा गैरफायदा घेत आयएनएक्सला थेट परदेशी गुंतवणुकीची परवानगी मिळवून दिली. या प्रकरणी कार्तिच्या कार्यालयांवर धाड सुद्धा टाकण्यात आल्या. त्यावर केंद्र सरकार सूड बुद्धीतून ह्या कारवाया करत असल्याचा आरोप त्यांनी लावला होता.
बातम्या आणखी आहेत...