आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटारा हत्या : मृत्युदंडास सुप्रीम कोर्टाचा नकार, दिल्ली सरकारची याचिका फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००२ मध्ये झालेल्या नितीश कटारा हत्याकांडप्रकरणी नीलम कटारा आणि दिल्ली सरकारची विनंती फेटाळली. हत्येचे दोषी विकास व विशाल यादव यांची शिक्षा वाढवावी व त्यांना मृत्युदंड द्यावा, अशी मागणी नीलम कटारा यांनी केली होती. हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ या श्रेणीत येत नसल्याची भूमिका न्यायमूर्ती जे. एस. खेहर आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या पीठाने घेतली. नितीशची आई नीलम कटारा यांची बाजू वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायपीठासमोर मांडली.

नितीशचा खून हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा दावा साळवेंनी केला. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही दोषींच्या शिक्षेचा कालावधी वाढवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. नितीशची प्रेमिका भारती यादव स्वत: आपल्या विवाहाचे निमंत्रण देण्यास कटारा कुटुंबीयांच्या दिल्ली येथील घरी आली होती. त्यामुळे नितीशचा खून ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे दिसून येत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. भारती व नितीशच्या नात्याबद्दल तिच्या घरचे अजाण होते असे सिद्ध होत नाही. विकास यादव बाहुबली नेता डी. पी. यादव यांचे पुत्र आहेत, तर विशाल त्यांचा पुतण्या आहे. या दोघांनी सुखदेव पहेलवान याच्या मदतीने नितीश कटाराचा खून केला. १६-१७ फेब्रुवारी २००२ च्या रात्री हा खून झाला होता.