आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Declines To Stay Defamation Case Against Arvind Kejriwal, News In Divya Marathi

केजरीवालांविरुद्ध खटला; सुनावणीच्या स्थगितीस नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचे पुत्र अमित यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अमित यांनी अरविंद केजरीवाल, आपचे नेते प्रशांत भूषण, शाजिया इल्मी तसेच मनीष शिसोदिया यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.

न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. एस. ए. बोबडे यांच्या न्यायपीठाने अँड. जयंत भूषण यांचा अर्ज फेटाळला. भूषण यांनी सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने त्यास नकार देत सुनावणी 22 जुलैपर्यंत पुढे ढकलली. त्याआधी 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल आणि अन्य नेत्यांविरुद्ध नोटीस जारी केली होती.