आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ महिन्यांपासून कैदेतील सहारा प्रमुखांवरील निर्णय टळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांना आणखी तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्यांच्या सुटकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. संपत्तीची विक्री आणि सेबीला पैसे परत देण्याची काय योजना आहे, हे सहाराला दोन आठवड्यांत सांगायचे आहे.

‘मनाचा मोठेपणा दाखवून सुब्रत रॉय यांना सोडून द्यावे. त्यांना तुरुंगात ठेवण्यात कोणाचाही फायदा नाही’, असे रॉय यांचे वकील कपिल सिब्बल सुनावणी दरम्यान म्हणाले. त्यावर आम्ही असंवेदनशील आहोत असे तुम्ही समजू नका. गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही तुमच्या अशिलास पैशांसंबंधीच विचारत आहोत. हे सामान्य प्रकरण नाही. ही व्यक्ती (रॉयकडे इशारा) १४ महिन्यांपासून तुरुंगात आहे. पैसे मिळतीलच याची तुम्ही कशी खात्री देणार? तुमचे आशील प्रत्येक वेळी बहाणे करून टाळाटाळ करतात. आम्ही तुम्हाला आणखी दोन आठवडे देतो. तुम्ही पैशांबाबत सांगा, असे न्या. टी. एस. ठाकूर यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने सुनावले. त्यावर सिब्बल यांनी सेबीने जप्त केलेल्या ७२ संपत्ती विकण्याची सहाराला परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर तुम्हाला कोणती संपत्ती विकायची आहे, हे आम्हाला सांगा, पैसे मिळणार असतील तर आम्ही जप्त संपत्ती सोडू, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी रुपये बुडवल्याच्या प्रकरणात ६५ वर्षीय सुब्रत रॉय तिहार तुरुंगात आहेत.