आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sc Dismissed All Petitions From Noida Greater Noida Land Acquisition Will Not Be Given To Farmers

नोएडा अधिग्रहण: शेतक-यांना धक्का, 2 लाख फ्लॅटधारक-बिल्डरांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोएडा एक्सटेंशन भागातीस सेझअंतर्गत जमिन भूसंपादनावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने फ्लॅट खरेदी करणा-यांना मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवताना शेतक-यांना जमिनी परत न करण्याचाच फैसला दिला आहे. यासंदर्भातील सर्व याचिका निकालात काढून उर्वरित याचिका रद्दबादल ठरवल्या आहेत. यापुढे कोणालाही कोर्टात जाता येणार नाही. दरम्यान, या निर्णयामुळे बिल्डरांकडून फ्लॅट खरेदी केलेल्या दोन लाखाहून फ्लॅटधारकांना सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
अलाहाबाद कोर्टाने 2011 साली दिला होता निर्णय- अलाहाबाद कोर्टाने 2011 साली नोएडा एक्सटेंशन भागातील जमिन अधिग्रहण चुकीचे ठरवले होते. मात्र, कोर्टाने ही जमिन शेतक-यांना देण्यासही विरोध केला होता. ग्रेटर नोएडा ऑथोरिटीने शेतक-यांना सुमारे 65 टक्के मोबदला व 10 टक्के विकसित जमिन देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शेतक-यांना त्यांचा मोबदला दिला गेला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात नोएडा ऑथोरिटी व शेतकरीही सुप्रीम कोर्टात गेले होते.
शेतक-यांना जमिन मिळणार नाही- शेतक-यांनी आमची जमिन आम्हाला परत मिळावी, आम्हाला मोबदला नको म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ही जमिन औद्योगिक वापरासाठी घेतली होती. मात्र, काही क्लॉज टाकून ही जमिन बिल्डरांच्या घशात घातली असा आरोप शेतक-यांनी केला होता. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी जमिन घेतली त्यासाठी तिचा वापर न केल्याने जमिनी शेतक-यांना मिळावी असे शेतक-यांचे म्हणणे होते.
बिल्डर व फ्लॅटधारकांना दिलासा- दुसरीकडे, अलाहाबाद हायकोर्टाचे निर्णय कायम ठेवताना सुप्रीम कोर्टाने फ्लॅटधारकांना दिलासा दिला आहे. शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबादला व 10 टक्के विकसित दिली गेली/जात असताना जमिन मागण्याचा त्यांना हक्क राहत नाही. तसेच ती जमिन परत करण्याचा प्रश्नही राहत नाही असे सांगत शेतक-यांचे म्हणणे फेटाळून लावले. या सर्व निर्णयामुळे दोन लाख फ्लॅटधारकांना दिलासा मिळाला आहे. नोएडा व ग्रेटर नोएडात एकून 65 गावे आहेत. या गावातील जमिन औद्योगिक विकासाच्या नावाखाली सरकारने घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाने यावरील सर्व याचिका फेटाळल्याने वेगाने विकास होईल हे स्पष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...