आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Dismisses Sanjay Dutt\'s Plea Seeking Review Of Its Judgement In The 1993 Mumbai Blasts Case.

संजय दत्तची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली, तुरुंगवास भोगावाच लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अभिनेता संजय दत्तला सर्वोच्‍च न्‍यायालयाने पुन्‍हा एकदा दणका दिला आहे. शिक्षेवर फेरविचार करण्‍याची संजय दत्तची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली आहे. त्‍यामुळे त्‍याला तुरुंगावास भोगावाच लागणार आहे. तसेच 15 मे रोजी त्‍याला शरण यावेच लागणार आहे.

1993च्‍या बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी संजय दत्तला अवैध शस्‍त्र बाळगल्‍याच्‍या आरोपात दोषी ठरवून 6 वर्षे तुरुंगात शिक्षा सुनावण्‍यात आली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तच्‍या शिक्षेतील 1 वर्ष कमी केले होते. त्‍यापैकी दिड वर्षे संजय दत्तने तुरुंगात घालविली आहेत. त्‍यामुळे त्‍याला उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा आता भोगावीच लागणार आहे. शिक्षेबाबत फेरविचार करण्‍यासाठी संजय दत्तने विनंती याचिका दाखल केली होती. ती आज फेटाळण्‍यात आली. सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तला शरण येण्‍यासाठी मुदतवाढही दिली होती. त्‍यानुसार त्‍याला आता 15 मे रोजी शरण यावेच लागणार आहे.