आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टात पाच नवे न्यायमूर्ती, 28 न्यायमूर्तींत केवळ एकच महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसह सर्वोच्च न्यायालयात आता २८ जज झाले आहेत. नव्या न्यायाधीशांमध्ये एकही महिला नाही. न्यायमूर्ती आर भानुमती सुप्रीम कोर्टाच्या एकुलत्या एक महिला न्यायाधीश आहेत.
 
सूत्रांनुसार हायकोर्टाच्या दोन महिला जजही सुप्रीम कोर्टात येण्याच्या शर्यतीत होत्या. पण कॉलेजियममध्ये सहभागी ५ वरिष्ठ जजच्या यादीत त्या जागा बनवू शकल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या ६७ वर्षांत फक्त ६ महिला येथे जज झाल्या. जस्टीस एम फातिमा बीवी १९८९ मध्ये या पहिल्या महिला जज झाल्या. त्यानंतर जस्टिस सुजाता व्ही. मनोहर, जस्टिस रिमा पॉल, जस्टिस ज्ञानसुधा मिश्रा, जस्टिस रंजना प्रकाश देसाई, जस्टिस आर भानुमती जज झाल्या.
 
'हे समजून घेणे कठीण आहे की, सर्व पुरुषांनाच का टीममध्ये ठेवले गेले? दोन महिला चीफ जस्टिस यांना सुप्रीम कोर्टात पाठवण्याचा विचार का नाही झाला?' - इंदिरा जयसिंह, वरिष्ठ वकील.
 
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, सुप्रीम कोर्टच्‍या पाच नविन न्‍यायाधिशांबद्दल...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)   
 
बातम्या आणखी आहेत...