आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Gives BCCI An Ultimatum: Remove Srinivasan Or We Will News In Marathi

श्रीनिवासन खुर्चीला का चिकटून आहेत, घृणा वाटते : सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जावई गुरुनाथ मयप्पनचा कथित सहभाग असलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या नि:पक्षपाती चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना अध्यक्षपद सोडण्यास सांगितले. त्यांनी स्वत:हून पद न सोडल्यास दोन दिवसांत आम्हीच निकाल सुनावू, असेही कोर्टाने बजावले. मुद्गल समिती अहवालावर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांनी यांच्या पीठाने सांगितले की, क्रिकेटला लागलेली कीड नष्ट करायची असेल तर श्रीनिवासन यांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही. खुर्चीला चिकटून बसण्याच्या त्यांच्या वर्तनाची घृणा वाटते, अशी प्रतिक्रियाही न्यायालयाने सुनावणीत व्यक्त केली.

न्यायाधीश v/s वकील
कोर्ट : श्रीनिवासन यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. प्रकरणाच्या नि:पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा द्यावा.
वकील : मात्र मुद्गल समितीच्या अहवालात श्रीनिवासन यांच्यावर कोणतेही आरोप लावलेले नाहीत. कोर्ट : आम्हाला लोकांची प्रतिमा मलिन करायची नाही. मात्र जोवर बोर्डाचे अध्यक्ष राजीनामा देत नाहीत तोवर निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
वकील : अध्यक्षांनी तर चौकशीत सहकार्यच केलेले आहे. त्यांनीच सर्वप्रथम चौकशी समिती स्थापली.
कोर्ट : मात्र ते अद्याप खुर्चीलाच का चिकटून बसलेले आहेत. त्यांचे वर्तन पाहून चीड येते. त्यांनी पद न सोडल्यास आम्हालाच निर्णय घ्यावा लागेल.
वकील : मुद्गल समितीच्या अहवालात श्रीनिवासनांविरुद्धही काही नमूद केलेले आहे काय?
कोर्ट : अहवालाची माहिती सर्वांसमोर जाहीर करणे योग्य ठरणार नाही. तुम्हीच या अन् वाचून पहा. पण श्रीनि यांच्या वकिलाच्या रूपात नव्हे तर एक निष्पक्ष व्यक्ती म्हणून..
वकील : अहवालात उल्लेख असलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करू नयेत, अशी विनंती आहे.
कोर्ट : खात्री पटली का! श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा की नाही, तुम्हीच सांगा.
शेवटी कोर्ट म्हणाले- तुमच्याकडे दोन दिवसांचा वेळ आहे. स्वत:च पद सोडा किंवा गुरुवारी आम्ही आमचा निकाल सुनावू.

पुढे काय होऊ शकते?
1. श्रीनिवासन यांनी पद सोडून तपासात सहकार्य करावे. अशात शिवलाल यादव बोर्डाचे अध्यक्ष बनू शकतात.
2. श्रीनिवासन हे आयसीसी बोर्डाचे अध्यक्ष बनल्याविरुद्धही (1 जुलै) आवाज उठवला जाऊ शकतो.
3. चौकशी सुरू झाली तर चेन्नई व राजस्थानचा संघ आयपीएलमधून निलंबित केला जाऊ शकतो.