आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Gives States 4 Months To Frame Acid Sale Policy

अ‍ॅसिड विक्री बाबत चार महिन्यात धोरण निश्चित करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात वाढलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना अ‍ॅसिड विक्रीबाबत धोरण निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने राज्यसरकारला 31 मार्च 2014 पर्यंत मुदत दिली आहे. तेसच हल्ल्यातील पीडितांच्या मदतीसाठी राज्य सरकारांनी योजना तयार करण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला आहे.
सध्या टॉयलेट क्लीनर म्हणून देशभरात लहानसहान किराणा दुकानांवरही अ‍ॅसिड सहज उपलब्ध होते. अ‍ॅसिड विक्रीवर पुरेसे निर्बंध आणावेत, अशी मागणी करणा-या याचिकेवर न्या. आर.एम.लोढा, मदन लोकूर आणि कुरिअन जोसेफ यांच्या पीठाने चार महिन्यांच्या आत अ‍ॅसिड विक्री संदर्भात धोरण निश्चित करण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, अ‍ॅसिड पॉयझन श्रेणीत