आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Grants Conditional Bail To Sahara Chief Subrata Roy

सुब्रतो रॉय, 10 हजार कोटी द्या, जामीन घ्या; 5 मिनिटे युक्तिवाद अन् सुप्रीम कोर्टाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट राजी झाले आहे. मात्र सर्वात मोठी अटही घातली आहे. सहाराला एकरकमी 10 हजार कोटी कोर्टात जमा करावे लागतील. यापैकी सेबीकडे रोख 5 हजार कोटी, उर्वरित 5 हजार कोटी बँक हमी म्हणून जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

सहाराने पैसा जमा करण्याचा फॉर्म्युला मंगळवारी न्यायालयात सादर केला होता. बुधवारी यावर केवळ पाचच मिनिटे सुनावणी झाली. यानंतर सहाराच्या वकिलांसमोर अटी ठेवून अंतरिम जामिनाचे आदेश बजावण्यात आले. सुब्रत रॉय न्यायालयाची अट मान्य करतात की नाही, हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. गुरुवारी यावर पुन्हा युक्तिवाद होणार आहे. सुब्रत रॉय यांनी अटी मान्य केल्यास त्यांच्यासह सहाराचे दोन संचालक रविशंकर दुबे व अशोक रायचौधरी यांचीही सुटका होऊ शकते.

सहाराचा प्रस्ताव
1. 2500 कोटी रुपये तीन दिवसांत कंपनी जमा करेल.
2. 3500 कोटींचे तीन हप्ते यंदा जून, सप्टेंबर, डिसेंबरअखेरपर्यंत देऊ
3. उर्वरित 7000 कोटी रुपये 31 मार्च 2015पर्यंत जमा करू.

जामिनाची कारणे
1. उर्वरित रकमेची तजवीज करता यावा म्हणूनच सुब्रतो रॉय यांना जामीन दिला जात असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
2. पैसे जमा करणे वगळता सहाराच्या इतर कोणत्याही पर्यायावर कोर्ट विचारही करणार नाही. पैसे दिले नाहीत तर सुब्रतो रॉय यांची सुटका केली जाणार नाही.

गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यावर आज विचार करणार
सुनावणीदरम्यान सहाराच्या वकिलांनी कंपनीची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करण्याची विनंती केली. यावर कोर्टाने त्यांना सर्व बँक खात्यांचे विवरण देण्यास सांगितले. त्याची सुनावणी गुरुवारी होईल. प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती के.एस. राधाकृष्णन व न्या. जे.एस. खेहर यांच्या पीठाकडून होत आहे.