आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Grants Zaibunissa, Others 4 Weeks To Surrender

मुंबई स्फोटातील सात दोषींना दिलासा, आत्मसमर्पणासाठी 4 आठवडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आत्मसमर्पणासाठी संजय दत्तला 4 आठवड्यांची मुदत दिल्यानंतर दुस- या दिवशी सुप्रीम कोर्टाने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील अन्य सात दोषींना 16 मेपर्यंत मुदत देऊ केली. यात कॅन्सर पीडित झैबुन्निसा काझीचा समावेश आहे. मानवतेच्या दृष्टीने ही मुदत देण्यात आल्याचे कोर्टाने म्हटले आहे.


गेल्या 21 मार्चला दिलेल्या निकालानुसार या सर्व दोषींना गुरुवारी आत्मसमर्पण करणे आवश्यक होते. मात्र आता 16 मेपर्यंत दिलासा मिळाला आहे. युसूफ मोहसीन नलवाला, अब्दुल रज्जाक मेमन आणि अल्ताफ अली सय्यद यांच्या याचिकांवर ही सुनावणी करण्यात आली. यानंतर मुदत वाढवून दिली जाणार नाही, असेही कोर्टाने बजावले.

युसूफ खानची याचिका फेटाळली : दोषी युसूफ खान याने आपली फेरविचार याचिका प्रलंबित असल्याचे दाखवून आत्मसमर्पणासाठी मुदत मागितली होती. मात्र, ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

25 दोषींचे आत्मसमर्पण : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 25 दोषींनी गुरुवारी टाडा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. या सर्वांना आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले. 11 दोषींनी बुधवारीच आत्मसमर्पण केले होते.