आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तुरुंगात सीएम (कँडल मेकर) होणार शशिकला; रोज 50 रुपये मजुरी, सामान्य बराकीतच वास्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई / बंगळुरू- अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला बुधवारी बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहाला शरण गेल्या. कैदी नंबर ९४३५ शशिकलांना तुरुंगात सीएम (कँडल मेकर) म्हणजे मेणबत्ती बनवण्याचे काम मिळेल. व्हीआयपी ट्रीटमेंट लांबची गोष्ट, त्यांना रविवारी सुटीही मिळणार नाही. दोन महिलांसोबत त्या सामान्य बराकीत राहावे लागेल. बेहिशेबी संपत्ती प्रकरणात दोषी शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना आत्मसमर्पणासाठी मुदत देण्यास नकार दिल्यावर त्यांनी चेन्नईत जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्मारकावर तीन वेळा हात आपटून नाट्यमयरीत्या त्या बंगळुरूला पोहोचल्या. या वेळी तुरुंगातच विशेष न्यायालय स्थापन केले होते. त्यांनी दोन आठवड्यांची मुदत व घरातील जेवण मिळण्याची परवानगी मागितली होती. या दोन्ही मागण्या फेटाळण्यात आल्या. शशिकलांसोबत त्यांची भावजय इलावारसी व भाचे सुधाकरन हेही शरण आले.
 
शशिकला व पलानीसामीवर आमदारांच्या अपहरणाचा गुन्हा
चेन्नई पोेलसांनी शशिकला व पलानीसामी यांच्यासह चार लोकांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आमदार एस.एस. सरवनन यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवला. त्यांनी सोमवारी रिसॉर्टमधून पळून येऊन डीजीपींकडे तक्रार दिली होती.
 
शशिकलांचे दोन नातेवाईक अण्णाद्रमुकमध्ये सामील
शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी दोन नातेवाइकांना अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश दिला. जयललिता यांनी त्यांची ५ वर्षापूर्वी हकालपट्टी केली होती. दरम्यान, शशिकलांनी भाचा टीटीव्ही दिनकरन यांची उपसरचिटणीसपदी नियुक्ती केली.
 
न्यायमूर्ती कुन्हा यांच्या निकालानंतर उमा, जयांना सोडावे लागले सीएमपद ...शशिकला सीएम हाेऊ शकल्या नाहीत
तीन वर्षांपूर्वी जयललिता व शशिकला यांना शिक्षा सुनावणारे कर्नाटकच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकेल कुन्हा यांच्या नावाशी योगायोग जुळून आला आहे. ज्यांच्या निर्णयानंतर दोन लोकप्रिय महिला नेत्या उमा भारती आणि जयललिता यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागावी, असे कुन्हा देशातील कदाचित पहिले न्यायाधीश आहेत. त्यांच्या निकालावर सर्वाेच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शशिकला यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली आहे. 

{ ऑगस्ट २००४ मध्ये हुबळीत इदगाह मैदानावर परवानगी नसतानाही उमा भारती यांनी तिरंगा फडकवला होता. कुन्हा यांच्या न्यायालयाने उमांविरुद्ध वॉरंट काढल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.

पुढील स्लाइडवर वाचा, निवडणूक लढू शकणार नाहीत शशिकला... सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केला होता खटला....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...