आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sc No Mediation In Rape Cases A Womans Body Is Her Temple

बलात्कार प्रकरणी समेट चुकीचा, महिलेचे शरीर मंदिराप्रमाणे - सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारासारख्या प्रकरणात आपसातील सेमट किंवा मध्यस्थी यांवार सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला आहे. एका प्रकरणाच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, की महिलेचे शरीर मंदिरा सारखे आहे. बलात्काराच्या प्रकरणात मध्यस्थी किंवा आपसातील समेट होऊ शकत नाही. मध्यप्रदेशातील कनिष्ठ न्यायालयाने बलत्कार प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्ततता केल्यानंतर राज्य सरकाररने केलेली याचिक स्विकार करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
समेट महिलेच्या सन्मानासोबत खेळ
जस्टिस दीपक मिश्रा यांच्या एक सदस्यीय पीठाने म्हटले आहे, की बलात्काराच्या प्रकरणात आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये समेट घडवून आणणे महिलेच्या सन्मानाविरोधात आहे. अशी मध्यस्थी करणाऱ्या लोकांमध्ये संवेदनशिलतेचा आभाव असतो. अशा प्रकरणात नरमाईचे धोरण अवलंबता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
मद्राह हायकोर्टाने अल्पवयीन मुलीसोबतच्या बलात्कारातील आरोपीला समेट घडवून आणण्यासाठी जामीन दिला होता. काही दिवसांपूर्वीच घडलेले हे प्रकरण चर्चेत होते. हायकोर्ट न्यायाधिशांनी सात वर्षांची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची 'मध्यस्थी आणि समेट' घडवून आणण्यासाठी जामीनावर मुक्तता केली होती. जस्टिस डी. देविदास म्हणाले होते, 'आरोपीने पीडितेच्या नावे एक लाखांची एफडी करावी.' पीडितेच्या आई-व़डिलांचे निधन झाले असून बलात्कारातून झालेल्या बाळाची ती आई आहे. या खटल्यातील आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड ठोठावला होता.
पीडितेने समेट नाकारला होता
तामिळनाडूच्या कुड्डलोरपासून 80 किलोमीटरवरील दुर्गम भागातील एका अविवाहित मातेने म्हटले होते, 'आरोपीला जामीन देताना न्यायधिशांनी एकदा तरी विचार केला होता का, की गेल्या सात वर्षे मी कसे काढले असतील ? बलात्कारानंतर आज सहा वर्षांची माझी मुलगी आहे. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मी तिला सांगेल की तुझा बाप बलात्कारी आहे.' पीडितेने ही ऑर्डर रद्द करण्याचीही मागणी केली होती.

काय आहे प्रकरण
2008 मध्ये जेव्हा पीडिता फक्त 14 वर्षांची होती तेव्हा गावातील व्ही. मोहन या व्यक्तीने कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला दिले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. मुलीच्या पालकांवर तिच्या गर्भपातासाठी मोठा दबाव टाकण्यात आला होता. मारहाण देखील केली जात होती. 2014 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड सुनावला होता. त्याविरोधात त्याने हायकोर्टात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने आपसात समेट घडवून आणण्याचा आदेश दिला होता.