आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नव-यासोबत संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीचे वय 18 वर्षे करण्याचे निर्देश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून यासंदर्भात उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे.
न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करुन घेण्यास मंजूरी दिली. त्यानंतर खंडपीठाने केंद्राकडून उत्तर मागितले आहे. 'आय थॉट' या स्वयंसेवी संघटनेने ही याचिका दाखल केली होती.
याचिकाकर्त्यांनी भारतीय दंडविधानानतील बलात्काराशी संबंधित कलम 375 मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या कलमानुसार, पतीसोबत पत्नीने संमतीने शारिरीक संबंध ठेवण्यासाठी एक अपवाद ठरविला आहे. पत्नीचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसेल आणि पतीने शारिरीक संबंध ठेवले, तर तो बलात्कार ठरणार नाही, अशी तरतूद या कलमानुसार करण्यात आली आहे. मुळात प्रौढत्व, विवाह आणि संमतीने शारिरीक संबंधासाठी 18 वर्षांची वयोमर्यादा आहे. त्यामुळे हा कायदा यासंदर्भातील कायद्यांसोबत विसंगत ठरतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महिलांना समतीने शरीरसंबंधांसाठीही हेच वय लागू करण्यात यावे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. विक्रम श्रीवास्तव यांनी न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.