आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाशीच्या अर्जांवर खुली सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणात दोषींच्या फेरविचार याचिकांवर आता खुल्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा निकाल िदला. आतापर्यंत अशा बहुतांश अर्जांवर न्यायमूर्तींच्या बंद कक्षातच सुनावणी होत होती.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने बहुमताने हा निकाल िदला. घटनापीठाने म्हटले आहे की, ‘ न्यायिक प्रक्रियेदरम्यान तुरुंगात प्रदीर्घ काळ राहणे हा फाशीच्या िशक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याचा आधार होऊ शकत नाही.’ मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन, दिल्लीच्या लाल किल्ला हल्ला प्रकरणातील दोषी मोहम्मद आरिफसह फाशीची शिक्षा ठाेठावण्यात अालेल्या काही आरोपींनी फेरविचार याचिका दाखल केली होती. आमच्या यािचकांवर खुल्या न्यायालयात सुनावणी केल्यानंतरच निर्णय घेतला जावा, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती.